शेरलॉक होम्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शेरलॉक होम्स | |
|---|---|
सिडनी पेजेट याने रेखलेले इ.स्.अ १९०४ मधील कल्पनाचित्र |
|
| कार्यकाल | इ.स. १८७७ - इ.स. १९१४ |
| लेखक | आर्थर कोनन डॉयल |
| माहिती | |
| सहकारी | डॉ. वॉटसन |
| व्यवसाय | सत्यान्वेषी |
| कुटुंब | मायक्रॉफ्ट होम्स (मोठा भाऊ) |
| राष्ट्रीयत्व | इंग्लंड |
| तळटिपा | |
शेरलॉक होम्स (इंग्लिश: Sherlock Holmes) हा आर्थर कोनन डॉयल यांनी लिहिलेल्या इंग्लिश भाषेतील कादंबरी मालिकेचा काल्पनिक नायक आहे. तो पेशाने सत्यान्वेषी आहे.
पात्ररचनेमागील प्रेरणा [संपादन]
आर्थर यांनी नमूद केले आहे, की शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्त्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत. आर्थर यांनी त्यांच्या एडिनबर्ग रॉयल इंफर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असे. 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स' महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहे असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. अशा तर्हेने सर आर्थर यांना वैद्यकीय तपासणी आणि गुन्हे अन्वेषण यांचा दुवा साधण्यास मदत झाली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |