नारळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शहाळे या पानावरून पुनर्निर्देशित)
माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

माड किंवा नारळ (शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट ;) हा विषुववृत्तीय उष्णकटिंबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळही याच नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मी. उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मी. लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला वर्षभर प्रत्येक महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचे अनेक उपयोग आहेत.

शहाळे

ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंडखनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तिंना विशेष उपयोगी समजले जाते.

अनुक्रमणिका

[संपादन] सांस्कृतिक महत्त्व

नारळाचे झाड

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान हे फळ पवित्र मानतात आणि त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ या नावानेही ओळखले जाते.

[संपादन] एकाक्ष नारळ

बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास एकाक्ष नारळ म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजला जातो.

शहाळी

मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू यांच्या ऐवजी नारळाचे बलिदान हे ईश्वरोपासनेचे एक रूप समजले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाचे बलिदान दिले जाते.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

[संपादन] हे सुद्धा पहा

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये