विमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विमा (इंग्लिश: Insurance) म्हणजे संभाव्य नुकसानीची शक्यता गृहित धरून ती कमी करण्याचा, म्हणजेच जोखीम व्यवस्थापनाचा, उपाय होय.

अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

प्रकार [संपादन]

आगीचा विमा [संपादन]

आगीचा विमा इमारतींना आणि आतील वस्तूंना संरक्षण पुरवतो.

आयुर्विमा [संपादन]

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध आयुर्विमा हे संरक्षण असते. मृत्यूपश्चात प्रमुख सदस्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन बिघडणार नाही याची खात्री करणे यासाठी आयुर्विमा आवश्यक असतो. प्रमुख सदस्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास आयुर्विमा ठरावीक रक्कम देतो जी भविष्यातील उत्पन्नाचा ओघ सुरू ठेवते किंवा इतर देय जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करते.

आरोग्य विमा [संपादन]

वाहन विमा [संपादन]

अपघात विमा [संपादन]

अपघात विमा घेतल्यावर विमाधारकास अपघाती मृत्यू आल्यास ठरलेली रक्कम विमाधारकाच्या वारसाला मिळते. अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार विमाधारकाला पैसे मिळतात. या शिवाय तात्पुरत्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास काही रक्कम देणाऱ्या अपघात विमा योजनाही असतात. अशा विम्याचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते.

इतर [संपादन]

विमा कंपनीग्राहक परस्पर करार करून उत्पन्न अथवा संपत्तीच्या कोणत्याही गोष्टीबाबत विमा करार करु शकतात. उदा: गायक/गायिका आपल्या स्वरयंत्राचा विमा उतरवू शकते. कामाचे स्वरूप व विमा देऊ करत असलेले फायदे यावर विम्याचा दर ठरतो.