भारतीय जीवन विमा निगम
| भारतीय जीवन विमा निगम Life Insurance Corporation of India |
|
| प्रकार | विमा कंपनी |
|---|---|
| स्थापना | १ सप्टेंबर १९५६ |
| मुख्यालय | मुंबई, भारत |
| उद्योगक्षेत्र | विमा |
| उत्पादने | जीवन विमा, म्युच्युअल फंड, गृहकर्ज |
| महसुली उत्पन्न | |
| कर्मचारी | १,१५,९९६ |
| मालक | भारत सरकार |
| ब्रीदवाक्य | ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी |
| संकेतस्थळ | www.licindia.in |
भारतीय जीवन विमा निगम (रोजच्या वापरातील संक्षेपः एलआयसी; हिंदी: भारतीय जीवन बीमा निगम; इंग्लिश: Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.
१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करुन निर्माण झालेल्या एलआयसीचे जीवन विमा हे प्रमुख उत्पादन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आजच्या घडीला अस्तित्वात आहेत.
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्वाचा भाग राहिला आहे. आजच्या घडीला १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.
पारंपारिकपणे मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणार्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.
[संपादन] बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
|
||||||||||||||||||||||
