विकिपीडिया:क्रीडा/खेळ/3

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॉकी, किंवा फिल्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरूध्द संघाच्या गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे मान्यता प्राप्त नाव हॉकी असले तरी ज्या देशा हॉ़की नाव इतर हॉकी प्रकारांसाठी उदा. आईस हॉकी, वापरल्याजाते त्या देशात ह्या खेळाला फिल्ड हॉकी म्हणले जाते.

हॉकी मध्ये पुरूष व महिलांसाठी अनेक नियमीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. महत्वाच्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक स्पर्धेंचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) हि खेळाची सर्वोच्च संघटना आहे. एफ आय एच हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावळी ठरवते.

अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉलक्रिकेट नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.

अधिक माहिती..