लाल बुडाचा बुलबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाल बुडाचा बुलबुल
Red-vented Bulbul (Pycnonotus cafer) feeding at Kapok (Ceiba pentandra) at Kolkata I IMG 2535.jpg
शास्त्रीय नाव Pycnonotus cafer
कुळ वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Red-vented Bulbul
संस्कृत कृष्णचूड
हिंदी बुलबुल, गुल्दुम

आकार[संपादन]

लाल बुडाचा बुलबुल हा साधारण २० सें. मी. (८ इं) आकाराचा पक्षी आहे.

आवाज[संपादन]

Redvented Bulbul.ogg या बुलबुलचा आवाज ऐका

शरिररचना[संपादन]

या बुलबुलचा मुख्य रंग धुरकट तपकिरी असून याच्या डोक्याचा रंग काळा असून त्यावर लहान शेंडी असते. याच्या पाठीवर आणि छातीवर तुटक रेषांसारख्या खुणा असतात तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो जो उडतांना स्प्ष्ट दिसतो. याची मुख्य ओळख म्हणजे याचा पार्श्व भाग लाल रंगाचा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वास्तव्य[संपादन]

लाल बुडाचा बुलबुल संपूर्ण भारतासह बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार येथील उष्णकटिबंधीय वनात, झुडपी जंगलात, शेतीच्या प्रदेशात, बागेत, जोडीने किंवा लहान थव्यात राहणारा पक्षी आहे. हा पक्षी माणसाच्या वस्तीजवळ आणि दूरही राहतो.

प्रजाती[संपादन]

याच्या रंग आणि आकारावरून किमान ७ उपजाती आहेत.

खाद्य[संपादन]

विविध कीटक, फळे, दाणे, मध हे बुलबुलचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन[संपादन]

फेब्रुवारी ते मे हा कालावधी या बुलबुलचा वीणीचा काळ असून जमिनीपासून १ ते १० मी. उंच झाडावर यांचे गवताचे, खोलगट घरटे असते. मादी एकावेळी २-३ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.