रामफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामफळ हे एक गोड फळ आहे.

रामफळ व पाने

झाडाचे वर्णन[संपादन]

रामफळ(इंग्रजीत Bullock's Heart, Common Custard Apple; शास्त्रीय नाव : अ‍नोना रेटिक्युलाटा) ह्या मध्यम उंचीच्या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे आहे.

आख्यायिका[संपादन]

खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेले रामफळ रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.

रामफळ उत्पादन[संपादन]

सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होऊ शकते.