मेदू वडा
Appearance
मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे.[१] याला उडीद वडा असेही म्हणले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.[२] दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो.
साहित्य आणि कृती
[संपादन]साहित्य -
- उडीद डाळ
- हिरव्या मिरच्या
- मीठ
- काळी मिरी
- कडीपत्ता
- तळण्यासाठी तेल
- नारळाचे काप [३]
कृती -
- उडीद डाळ प्रथम स्वच्छ धुऊन घ्यावी. ४ ते ५ तास उडीद डाळ पाण्यात भिजत घालावी. डाळ भिजल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाकावे आणि केवळ डाळ मिक्सरमधून वाटून घ्यावी.
- वाटलेल्या डाळीत मीठ, कुटलेली मिरी, हिरव्या मिरचीचे तुकडे,आणि असल्यास नारळाचे काप घालावेत.
- कढईत तेल गरम करायला;आहे ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात वडे सोडावेत. तळहातावर पिठाचा गोल करून त्याला मध्यभागी भोक पाडावे किंवा झाऱ्यावर असा वडा तयार करून घेऊन तो कढईत गरम तेलात सोडावा.
- सोनेरी रंग आल्यावर वडा आतून पूर्ण तळला गेला आहे याची खात्री झाल्यावर वडा तेलातून बाहेर काढावा आणि तेल पूर्ण निथळून घ्यावे.
- नारळाची चटणी आणि सांबार याबरोबर खाण्यासाठी द्यावे. [४]
चित्रदालन
[संपादन]-
मेदू वडा आणि चटणी
-
मेदू वडा सांबार
-
भारतीय न्याहरीत मेदू वडा
-
मेदू वडा चटणी
-
दही वडा
-
Uzhunnu Vada (ഉഴുന്ന് വട)
संदर्भ
[संपादन]- ^ "Medu Vada Recipe: घर पर बनाएं टेस्टी और क्रिस्पी साउथ इंडियन डिश मेदू वड़ा". www.timesnowhindi.com (हिंदी भाषेत). 2020-08-30. 2020-09-13 रोजी पाहिले.
- ^ Hingle, Richa. Vegan Richa's Indian Kitchen: Traditional and Creative Recipes for the Home Cook (अंग्रेजी भाषेत). Andrews McMeel Publishing. ISBN 9781941252109. 21 December 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Medu Vada: What Makes it Such a Popular Breakfast Treat". NDTV Food. 2020-09-13 रोजी पाहिले.
- ^ "How to make medu vada or medhu vadai". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2019-04-30. 2020-09-13 रोजी पाहिले.