मीठ
मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महच्वाचा घटक, क्षार आहे..
अनुक्रमणिका |
प्रकार [संपादन]
- साधे मिठ- हे समुद्रापासून मिळते.
- शेंदेलोण-
- पादेलोण- हे जमिनीतून मिळवले जाते.
इतिहास [संपादन]
मानवी आरोग्यावर परिणाम [संपादन]
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच वनपस्तीजीवनास हानिकारक असते. हा क्षार शरिराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरिरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरिरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, पोटऱ्यामध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, हाडे कमकुवत होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, मुत्रपिंडाचे कार्य वाढते हात, पाय चेहरा पोट यावर सूज येते. मीठाचे प्रमाण आहारात चवीपुरताच असावे.
मिठाची शेती [संपादन]
समुद्र किनारी वाफे तयार करून त्यात समुद्राच पाणी साठवल जात. सूर्याच्या उण्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणाऱ्या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात.