Jump to content

मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट शृंखला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉलच्या मुंबईमधील विशेष प्रदर्शनावेळी टॉम क्रूझ, पॉला पॅटन व अनिल कपूर

मिशन: इम्पॉसिबल (इंग्लिश: Mission: Impossible) ही एक इंग्लिश-भाषिक थरारपट चित्रपटांची शृंखला आहे. हॉलिवूड अभिनेता व निर्माता टॉम क्रूझ ह्या शृंखलेमधील आजवरच्या सर्व पाच चित्रपटांमध्ये नायकाच्या भुमिकेत चमकला आहे. मिशन: इम्पॉसिबलमध्ये टॉम क्रूझने इथन हंट नावाच्या काल्पनिक गुप्तहेराची भूमिका रंगवली आहे. क्रूझ ह्या सर्व चित्रपटांचा सहनिर्माता देखील आहे. आजवर एकत्रित २००० कोटी डॉलर्सची कमाई करणारी मिशन: इम्पॉसिबल शृंखला जगातील २१वी सर्वात यशस्वी चित्रपट शृंखला आहे.

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट दिग्दर्शक निर्माता निर्माण खर्च आजवरचे उत्पन्न
१९९६ मिशन: इम्पॉसिबल ब्रायन दे पामा टॉम क्रूझ
पॉला वॅग्नर
$८ कोटी $४५,७६,९६,३५९
२००० मिशन: इम्पॉसिबल २ जॉन वू $१२.५ कोटी $५४,६३,८८,१०५
२००६ मिशन: इम्पॉसिबल ३ जे.जे. ॲब्रम्स $१५ कोटी $३९,७८,५०,०१२
२०११ मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल ब्रॅड बर्ड टॉम क्रूझ
जे.जे. ॲब्रम्स
ब्रायन बर्क
$१५ कोटी $६९,४७,१३,३८०
२०१५ मिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन क्रिस्टोफर मॅकक्वेरी टॉम क्रूझ
जे.जे. ॲब्रम्स
ब्रायन बर्क
डेव्हिड एलिसन
$१५ कोटी $१२,०५,२०,०८९
२०१८ मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट टॉम क्रूझ
जे.जे. ॲब्रम्स
क्रिस्टोफर मॅकक्वेरी
जेक मायर्स
$१७.८ कोटी $७९१,०१७,४५२

बाह्य दुवे

[संपादन]