मराठी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडियाचा लोगो
दुवा http://mr.wikipedia.org
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
व्यावसायिक? चॅरिटेबल
प्रकार ऑनलाइन ज्ञानकोश प्रकल्प
नोंदणीकरण वैकल्पिक
आशयाचा परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स अट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सँगर
अनावरण मे १, इ.स. २००३

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या ऑनलाइन मुक्त ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, इ.स. २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ३५,००० आकड्यावर जाऊन पोचली.

आरंभ[संपादन]

वसंत पंचमी या लेखाचे १ मे, इ.स. २००३ रोजी झालेले पहिले संपादन हे मराठी विकिपीडियावरील सर्वांत जुने ज्ञात संपादन आहे प्रदीप माळी

मराठी विकिपीडियावरील टिका[संपादन]

दैनिक प्रहारचे पत्रकार अभिजीत ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११ च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहून; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमीत सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तिंना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या ति-हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टिका केली. [१]

तथ्यशोधाचा मार्गच नाकारणं, फक्त भाषांतरित माहिती देणं, ही जी टोकं इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाइन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाइन मराठी’नं गाठली. याचं कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच , कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणा-याची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळं सारख्याच जातीची आहेत, अस विकिपीडियातही दिसत.[१]


येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधीक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे.वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादनं पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हं एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात.पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केलं जात.[१]संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे पूर्ण संशोधन करून संदर्भासहीत लेख लिहीण्याचे प्रमाण नगण्यच आहे.

संदर्भ दर्शवा[संपादन]

  1. १.० १.१ १.२ विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी![मृत दुवा], ह्या लेखाची दिलेल्या दुव्यावरील इंटरनेट आवृत्ती दिनांक ४ मे २०१२ , १ वाजून २२ मिनीटांनी पडताळली

बाह्य दुवे[संपादन]