बोड्डेपल्ली राजगोपाल राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोड्डेपल्ली राजगोपाल राव (१२ मार्च १९२३- २२ फेब्रुवारी १९९२) हे भारतीय राजकारणी होते. ते १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तर १९५७, १९६२, १९७१, १९७७ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.