Jump to content

बॉम्बे (१९९५ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॉम्बे (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉम्बे
दिग्दर्शन मणी रत्नम
निर्मिती एस श्रीराम
कथा मणी रत्नम
प्रमुख कलाकार अरविंद स्वामी
मनीषा कोईराला
छाया राजीव मेनन
गीते मेहबूब
संगीत ए.आर. रेहमान
पार्श्वगायन उदित नारायण, हरिहरन, कविता कृष्णमुर्ती
देश भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित १० मार्च १९९५
टीपा
हिंदी, तेलुगू भाषांमध्ये ध्वनिमुद्रित



बॉम्बे हा १९९५ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाचे हिंदी व तेलुगु भाषेतून देखील ध्वनिमुद्रण करण्यात आले होते. दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी व अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता प्रकाश राज, नास्सर यांच्या देखील भूमिका आहेत. बॉम्बे चित्रपटाचे दिग्दर्शन मणी रत्नम यांनी केले आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.

कथानक

[संपादन]

एका मुस्लिम तरुणीच्या प्रेमात हिंदू तरुण पडतो. परंतु दोघांच्या कुटुंबातील व्यक्तींना हे अजिबात सहन होत नाही. आपला धर्माभिमान दोन्ही प्रेमिकांचे वडील सोडण्यास तयार नसतात. घरच्यांचा विरोध लक्षात घेऊन दोघेही बॉम्बे (मुंबई)ला पळून येऊन लग्न करतात व मुंबई येथेच राहतात. मधील काळात त्यांना २ मुले देखील होतात. १९९२ साली झालेल्या बाबरी मस्जिद व अयोध्या प्रकरणानंतर उसळलेल्या हिंदू - मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे कथानक रंगविण्यात आले आहे. १९९२ मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबई (बॉम्बे) मध्ये दंगली उसळतात. त्यामध्ये नायकाचे कुटुंब देखील होरपळून निघते. परंतु सरते शेवटी सर्व परिस्थितीवर मात करून धार्मिक द्वेषाला प्रेम जिंकून घेते व चित्रपटाचा शेवट होतो. परंतु यामध्ये नायिकेचे आई वडील व नायकाचे वडील देखील मरण पावतात. मुंबई शहरात झालेल्या तणावाच्या वातावरणात चित्रपटाची कथा असल्याने बॉम्बे असे नाव आहे.

संगीत

[संपादन]

जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांनी बॉम्बे चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी अतिशय सुश्राव्य असून लोकप्रिय बनली आहेत. कविता कृष्णमुर्ती, हरिहरन, उदित नारायण इ. गायकांनी आपल्या आवाजाने चित्रपटातील गीतांना सजविले आहे. संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू राहिली आहे. कहना ही क्या आणि कुची कुची रखमा ही गाणी विशेष गाजली.