बुर्ज खलिफा (जुने नाव बुर्ज दुबई [१]) ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही आजच्या घडीला जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले. ह्या इमारतीत १६३ मजले व १०४४ सदनिका आहेत.[२] याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. प्रति सेकंद १० मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत, तर ८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३५,९५,१०० वर्ग फूट इतके आहे. बुर्ज खलिफ्याच्या बांधकामासाठी ४.१ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.
बांधकाम क्रियेचे अॅनिमेशन
बाह्य दुवे [संपादन]
चित्र दालन [संपादन]