फासेपारधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फासेपारधी हे एका भटक्या जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांचीपक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांना दिसतात.

इंग्रजांच्या राज्यात विविध भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती कायदा १८७१ नुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते. तेव्हापासुन आजतागायत या जमातींवरचा हा अन्यायकारक ठपका पुसल्या गेलेला नाही.[ संदर्भ हवा ]

फासेपारधी जरी वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करीत असले तरीही त्यांच्या शिकारीचे काही नियम आहेत जे पक्षांची संख्या कमी होऊ देत नाही असे दिसुन आले आहे. उदा.[ संदर्भ हवा ]

१. ते पक्ष्यांच्या अंड्यांची शिकार करीत नाहीत व खांण्यासाठीही त्यांचा वापर करीत नाहीत.

२. ते पक्ष्यांच्या घरट्यांना हातही लावीत नाहीत

३. ते शक्यतो मादी पक्ष्यांची शिकार करीत नाहीत

४. शिकार करतांना गरजेपेक्षा जास्त पक्षी किंवा प्राणी सापड्ल्यास ते जास्तीच्या पक्षांना किंवा प्राण्यांना सोडुन देतात.

५. त्यांची शिकार साधने प्राचिन असून ते बंदुक किंवा दारुगोळा वापरीत नाहीत

पक्षांच्या कमी होत असलेल्या संख्येमुळे फासेपारधी शिकार सोडुन ईतर पर्यायांच्या शोधात असून सरकारने त्यांना मदत करण्यास जोरकस पावले उचलण्याची गरज आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये