प्रियांका चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
प्रियांका चोप्रा
Priyanka chopra at filmfare launch.jpg
प्रियांका चोप्रा
पूर्ण नाव प्रियांका चोप्रा
जन्म जुलै १८, १९८२
जमशेदपूर, झारखंड, भारत
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट फॅशन (चित्रपट)

प्रियांका चोप्रा, मिस वर्ल्ड २०००, ही सध्याची बॉलीवूडमधील आघाडीची कलाकार आहे.

[संपादन] जीवन

प्रियांका चोप्राचा जन्म १८ जुलै, १९८२ रोजी जमशेदपूर येथे झाला. प्रियांका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा, तर आईचे नाव मधु चोप्रा. प्रियांका चोप्राचे वडील लष्करामध्ये असल्यामुळे त्यांचं कुटुंब नेहमी फिरतीवर असायचं. त्यामुळे प्रियांका चोप्राला पूर्ण भारतीय संस्कृतीची ओळख झाली. प्रियांका चोप्राने आपल्या शिक्षणाची सुरुवात 'ला मार्टीनियर कन्या महाविद्यालय', लखनऊ येथे निवासी विद्यार्थी म्हणून केली. त्यानंतर थोड्या कालावधीसाठी तिने 'मारिया गोरेटी महाविद्यालय', बरेलीमधूनही शिक्षण घेतले. प्रियांका चोप्राने दहावीचं शिक्षण बोस्टन, अमेरिका येथून पूर्ण केलं. त्यावेळी तिची महत्त्वाकांक्षा सॉफ्टवेयर अभियांत्रिकी किंवा गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ होण्याची होती. बोस्टनवरून परतल्यानंतर तिने 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला, तसेच ही स्पर्धा जिंकलीसुद्धा. यानंतर प्रियांका चोप्राच्या कारकिर्दीची पूर्ण दिशाच बदलून गेली.

[संपादन] कारकीर्द

फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियांका चोप्राने विश्वसुंदरीचा खिताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलीवूडमध्ये आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला तिचा पहिला चित्रपट होता अनिल शर्मा दिग्दर्शित 'हिरो'. या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचं पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या 'अंदाज' या चित्रपटावर होतं. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मतं मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियांकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली.

यशाबरोबरच प्रियांका चोप्राला बऱ्याच वादांनाही तोंड दयावं लागलं. आणि त्यावेळी प्रियांका चोप्राने 'राजा भैय्या' आणि 'जान कि बाझी' हे दोन चित्रपट सोडून दिले होते. तिचे 'प्लॅन' (२००४) आणि 'किस्मत' (२००४) हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. 'असंभव' चित्रपटामध्ये तिची भूमिका केवळ ग्लॅमर वाढवण्यापुरती होती.

[संपादन] चित्रपट

  • २००२

तमिझान (तमिळ)

  • २००३

द हिरो, अंदाज, मिस इंडिया: द मिस्टरी

  • २००४

प्लॅन, किस्मत, असंभव, मुझसे शादी करोगी, ऐतराज

  • २००५

ब्लॅकमेल, करम, वक्त, यकीन, बरसात, ब्लफमास्टर

  • २००६

टॅक्सी नं. ९ २ ११, ३६ चायना टाऊन, अलग, क्रिश, आप की खातीर, डॉन

  • २००७

सलाम-ए-इश्क, बिग ब्रदर

  • २००८

लव स्टोरी २०५०, गॉड तुसी ग्रेट हो, चमकू, द्रोणा, फॅशन, दोस्ताना

  • २००९

कमीने, व्हॉट्स युवर राशी

  • २०१०

प्यार इम्पॉसिबल, अनजाना अनजानी

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये