पिंक फ्लॉइड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पिंक फ्लॉइड | |
पिंक फ्लॉइड चमूचे पाच संगीतकार (इ.स. १९६८) |
|
| संगीत प्रकार | रॉक |
| कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६५-१९९६, इ.स. २००५ |
| संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
पिंक फ्लॉइड (मराठी लेखनभेद: पिंक फ्लॉईड ; इंग्रजी: Pink Floyd ;) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बँड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बँड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.
इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६०च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली द पायपर अॅट द गेट्स ऑफ डॉन हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक डेव्हिड गिल्मोर या चमूत दाखल झाला.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- पिंक फ्लॉइड चमूचे अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)