Jump to content

पांडुरंग सुखात्मे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पांडुरंग सुखात्मे
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
नागरिकत्व भारतीय
पेशा वैज्ञानिक , गणितीशास्त्रज्ञ
धर्म हिंदू
वडील वासुदेव

पांडुरंग वासुदेव सुखात्मे (१९११ - १९९७) हे प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होते. त्यांना इ.स. १९७१ साली भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. "इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट" या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता.

आयुष्य

[संपादन]

पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै, इ.स. १९११ रोजी महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला. इ.स. १९३२ मध्ये त्यांनी फर्गुसन कॉलेज मधून गणित विषयात पदवी मिळवली. इ.स. १९३३ ते १९३६ च्या काळात लंडन विद्यापीठात शिकत असताना त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.[]

कार्यभार

[संपादन]
  • १९४०-१९५१: इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च
  • १९५१-१९७१: फाओ (FAO)

योगदान

[संपादन]

पांडुरंग सुखात्मे यांनी गणिती शास्त्रात मोलाचे काम केले , त्यांचे "स्टाटिस्टिकल थिअरी ऑफ स्यांपलिंग" वरील कामाची विशेष दाखल घेतली जाते.[]

त्यांची इतर वाखाणण्याजोगी कामे -


  • द बायपार्टिशन फंक्शन - फिश्चर यांच्या मार्गदर्शनाखाली.
  • थिअरी ऑन मेजरमेंट ऑफ अन्डरन्यूट्रिशन - या साठी त्यांना पुरस्कार मिळाला.

पुरस्कार

[संपादन]

भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार त्यांना मिळाला.

संदर्भ

[संपादन]


  • P. V. Sukhatme (1966) Major Developments in Sampling Theory and Practice, in F. N. David (ed.) Research Papers in Statistics, New York: Wiley.
  • Shashikala Sukhatme (2002) Pandurang V. Sukhatme 1911–1997, Journal of Statistical Planning and Inference, 102(1), 3-24.
  1. ^ "संख्याशास्त्रज्ञ डॉ. सुखात्मे". Maharashtra Times. 2020-03-26 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "विश्व व्यापून उरणारं संख्याशास्त्र". Maharashtra Times. 2020-03-26 रोजी पाहिले.[permanent dead link]