| पांडुरंग सुखात्मे |
| राष्ट्रीयत्व |
भारत |
| नागरिकत्व |
भारतीय |
| पेशा |
वैज्ञानिक , गणितीशास्त्रज्ञ |
| धर्म |
हिंदू |
| वडील |
वासुदेव |
पांडुरंग वासुदेव सुखात्मे (1911-1997) हे प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होते. त्यांना १९७१ साली भारतभूषण देवून सम्माणीत करण्यात आले. "इंडियन अॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इंस्टीट्यूट" या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता.
पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै १९११ रोजी महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला. १९३२ मध्ये त्यांनी फर्गुसन कॉलेज मधून गणित विषयात पदवी मिळवली. १९३३ ते १९३६ च्या काळात त्यांनी लंडन विद्यापीठात शिकत असताना त्यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आले.
- 1940-1951: इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च
- 1951-1971: फाओ (FAO)
पांडुरंग सुखात्मे यांनी गणिती शास्त्रात मोलाचे काम केले , त्यांचे "स्टाटिस्टिकल थ्यरी ऑफ स्यांपलिंग" वरील कामाची विशेष दाखल घेतली जाते. त्यांची इतर वाखाग्न्याजोगी कामे -
- द बायपारटिशन फन्क्षन - फिश्चर यांच्या मार्गदर्शनाखाली.
- थ्यरी ऑन मेसरमेंट ऑफ अन्डरन्यूट्रिशन - या साथी त्यांना पुरस्कार मिळाला.
- P. V. Sukhatme (1966) Major Developments in Sampling Theory and Practice, in F. N. David (ed.) Research Papers in Statistics, New York: Wiley.
- Shashikala Sukhatme (2002) Pandurang V. Sukhatme 1911–1997, Journal of Statistical Planning and Inference, 102(1), 3-24.