पसायदान
संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.
अनुक्रमणिका |
[संपादन] लेखक - श्री संत ज्ञानेश्वर
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे || तोषुनी मज द्यावे | पसायदान हे ||
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरुपात वसलेल्या आद्य रूपाचे वर्णन करता करता शेवटच्या अध्यायात त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळा ) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रुपी वाक यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात .........
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
ज्या व्यक्ती खळ( वाईट प्रवृत्तीच्या )आहेत त्यांच्यातील खलत्व ( वाईट प्रवृत्ती ) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे तर त्यांची प्रवृत्ती सतप्रवृत्तीत परावर्तीत व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्रा होवोत ! { जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम" ( दुष्टांचा नाश करण्यासाठी )साठी मी जन्म घेतो असे म्हंटले तेथे त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी असा "प्रसाद" मागितला}
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||३||
वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे , नदीचा प्रवाहित राहणे , त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला तर त्या धर्म रुपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की , ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल , कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर "माउलींनी" 'प्राणिजात' असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे !
[संपादन] परभाषातील पसायदानाची भाषांतरे
- उर्दू अब्दुस सत्तार दळवी [१]
[संपादन] संदर्भ
- ↑ Google's cache of http://chavata1.blogspot.com/. It is a snapshot of the page as it appeared on 8 Feb 2011 17:12:32 GMT.