पडवळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पडवळ (शास्त्रीय नाव: Trichosanthes anguina, ट्रायकोसँथेस अँग्विना ; इंग्रजी: Snake Gourd, स्नेक गोअर्ड वा गुअर्ड ;) ही एक उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. ह्याला लक्षणीय अशा लांबलचक आकाराची फळे लगडतात. ही फळे भाजी म्हणून व त्याच्या औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. तसेच ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये प्रचलित असणाऱ्या डिजेरिडू या वाद्याच्या निर्मितीसाठीही पडवळांचा वापर होतो.
पडवळाची फळे सुमारे १५० सें.मी. लांबीपर्यंत वाढतात. त्यांच्या आत पांढुरक्या हिरव्या रंगाचा, मऊ, रसदार गर असतो. दक्षिण आशियातल्या व आग्नेय आशियातल्या देशांमध्ये पडवळाच्या फळांचा वापर पाककृतींसाठी केला जातो.
बाह्य दुवे [संपादन]
- फ्लिकर.कॉम - चित्र (मराठी मजकूर)