नोबेल पारितोषिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनिय संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्युनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.
ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तिंना ७८१ नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] पार्श्वभूमी

आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल या स्वीडीश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी ही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके जगात सर्वोच्च सन्मानाची समजली जातात. आल्फ्रेड नोबेल याच्या पाचव्या पुण्यतिथिपासून म्हणजेच १० डिसेंबर, इ.स. १९०१ पासून ही पारितोषिके देण्यास सुरूवात झाली. भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान (वैद्यक), साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (शांतता) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दिली जातात.

इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बॅंकेने (रिक्स बॅंकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात केली.

[संपादन] नोबेल याच्या मृत्यूपत्रातील तरतूदी

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्यूपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्यूपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडीश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्यूपत्रात सुचविेले होते.

या मृ्त्यूपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवरर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्यूपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली.

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूपत्रान्वये भौतिकी व रसायनशास्त्रातील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडीश ॲकेडेमी ऑफ सायन्सेसकडे, शरीरकिक्रयाविज्ञानचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे, साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडीश ॲकेडेमीकडे तसेच नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टींग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत. पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती नेमण्यात येते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.

मृत्यूपत्रातील तरतूदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो.

[संपादन] नामांकन

कायदेशीरपणे नमूद केलेल्या व पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीच पारितोषिकांसाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात. स्वतःच आपले नाव सुचविल्यास ती व्यक्ती आपोआपच पारितोषिकासाठी अपात्र ठरते.

उमेदवारांची नावे सुचविण्यासाठी पुढील व्यक्ती पात्र असतात.

  • आधीचे नोबेल पारितोषिक विजेते.
  • पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे सभासद.
  • खास उल्लेखिलेल्या विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे तसेच पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी खास निमंत्रित केलेले त्या त्या क्षेत्रातील प्राध्यापक.
  • साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रातिनिधिक संघटनांचे सभासद.
  • द स्वीडीश ॲकेडेमीशी तुल्य अशा संस्थांचे सभासद.
  • शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात.
  • उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते संस्थेला नाही, मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात.

पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतीपत्रे पाठविली जातात. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारसी १ फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात. १ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारसी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात. या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत गुप्तता राखली जाते. नोबेल पारितोषिकांच्या निर्णयाविरूद्ध दाद मागता येत नाही.


[संपादन] नामांकन आणि प्रदान प्रक्रिया

३००० लोक साधरनताहा पुरस्कारसाठी नामांकन पाठवतात. त्यापैकि नोबेल समिति ठरावीक नामांकने निवडते.

[संपादन] पूर्व विजेते

[संपादन] नोबेल पुरस्कार नाकारणारे

देऊ केलेला नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ति-

  • चार व्यक्तिंना हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन - त्यांच्या सरकारतर्फे करण्यात आल्यामुळे नाकारला. यापैकी तीन जर्मन (हिटलरमुळे) व उरलेली व्यक्ति रशियन लेखक बोरीस पास्तेर्नाक (साहित्यातील नोबेल)-सरकार सूड उगवेल या भीतीपोटी नाकारला.[ संदर्भ हवा ]
  • उत्तर व्हियेतनाम: लु डक थो (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नाकारला.[ संदर्भ हवा ]

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्य दुवे


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये