नायका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नायका

नायका ही एक कॉस्मेटिक आणि ब्रॅंड उत्पादनांची विक्री करणारी एक भारतीय वेबसाईट आहे. फाल्गुनी नायरने एप्रिल २०१२ मध्ये एक कॉस्मेटिक आणि ब्रॅंड उत्पादनांची विक्री करणारी एक वेबसाईट म्हणून सुरुवात केली, आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळवरील टी ३ टर्मिनल मध्ये आपले पहिले रिटेल स्टोअर उघडले. नायकाने आतापर्यंत ४०० वेगवेगळ्या ब्रॅंड उत्पादनांची विक्री केली आहे. त्यांचा संकेतस्थळवर सुमारे ४०,००० उत्पादने आहेत.


इतिहास[संपादन]

फाल्गुनी नायर यांनी एप्रिल २०१२ मध्ये नायकाची स्थापना केली, कंपनीने अनेक फेरी निधीद्वारे पैसे उभारले. जुलै २०१४ मध्ये, खाजगी गुंतवणूकदारांकडून निधीसाठी २० कोटी रुपयांची उभारणी केली. टीव्हीएस कॅपिटलच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०१५ मध्ये सुमारे ६० कोटी रुपये निधी उभारला.

सेवा[संपादन]

नायका ही एक ई-कॉमर्स संकेतस्थळ आहे, ज्यामध्ये लॅक्मे, काया स्किन क्लिनिक, लोरीअल पॅरीस यासारख्या आघाडीच्या ब्रॅण्डची सौंदर्य उत्पादने आहेत. मुंबई, नवी दिल्ली आणि बंगलोर येथे त्यांची वेअरहाऊस आहेत. नायकाकडे १७ रिटेल स्टोर्स विस्तारीत आहेत. नायकाने आतापर्यंत ४०० वेगवेगळ्या ब्रॅंड उत्पादनांची विक्री केली आहे. त्यांचा संकेतस्थळवर सुमारे ४०,००० उत्पादने आहेत. नायकाचे मुख्य लक्ष २२-३५ या वयोगटाकडे आहे.