नाथ संप्रदाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवनाथ या पानावरून पुनर्निर्देशित)

इतर नावे : योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय

नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावापुढे "नाथ" असा प्रत्यय लावतात.

या संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ यांनी केली आणि गोरक्षनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला.

नाथपंथ लेखातून विलिनीकरणासाठी स्थानांतरीत[संपादन]

नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्याच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय.मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारुपाला आणले. ह्या संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विस्तृत विवेचन उपर्युक्त नाथ संप्रदाय ह्या विश्वकोशीय नोंदीत आढळेल; तथापि शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही ह्या संप्रदायाची भूमिका आहे. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत ऐकमत्य नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वपूर्ण स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरुपात संबंध आलेला दिसतो.

संदर्भ[संपादन]

नवनाथ[संपादन]


नवनारायण नवनाथ[संपादन]

नवनाथ नवनारायण गुरू
मच्छिंद्रनाथ कवि दत्तात्रेय
गोरक्षनाथ हरि मच्छिंद्रनाथ
गहिनीनाथ करभाजन गोरक्षनाथ
जालिंदरनाथ अंतरिक्ष दत्तात्रेय
कानिफनाथ प्रबुद्ध जालिंदरनाथ
भर्तरीनाथ द्रुमिल दत्तात्रेय
रेवणनाथ चमस दत्तात्रेय
नागनाथ आविर्होत्र दत्तात्रेय
चरपटीनाथ पिप्पलायन दत्तात्रेय


`

नवनाथ Om.svg
मच्छिंद्रनाथगोरक्षनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथभर्तरीनाथरेवणनाथनागनाथचरपटीनाथ