नऊवारी साडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नऊवारी साडी नेसलेली किशोरी (अंदाजे इ.स. १८७२च्या सुमारास)

नऊवारी साडी हा स्त्रियांच्या साडीचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि लगतच्या भूप्रदेशांत पूर्वापार प्रचलित असलेला प्रकारविशेष आहे. हिची लांबी नऊ ते साडे नऊ वार असल्याने हिला नऊवारी साडी असे म्हटले जाते. ही साडी नेसायला पेट्टीकोट घालणे गर्जेचे नव्हे.[१]. ह्या साड्या महाराष्ट्रातील ब्राह्मीन समाजातील महिला नेसतात.[२]

नेसण्याची पद्धत[संपादन]

शेतात किंवा इतर कामे करणाऱ्या बायका ही साडी घोट्याच्यावर किंवा गुडघ्याखालपर्यंत नेसतात; तर घरांत, समारंभांसाठी किंवा इतर ठिकाणी ही साडी घोट्याखालपर्यंत नेसली जाते. या साडीच्या दुभागलेल्या काष्टा पद्धतीमुळे काम करण्यास, जलद वावर करण्यास, इतकेच नव्हे तर घोडेस्वारी करण्यासाठीही ही साडी सुरक्षित समजली जाई/ जाते. इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची नऊवारी साडी ही वेशभूषा होती आणि या वेशभूषेतूनच त्या रणांगणावर लढल्या[ संदर्भ हवा ].

बाह्य दुवे[संपादन]

  1. http://books.google.co.in/books?ei=1RFqTuDbMcHYgAeK_OXyBQ&ct=result&id=M6iyAAAAIAAJ&dq=marathi+sari&q=marathi#search_anchor
  2. http://books.google.co.in/books?id=irh9dvlLz3MC&dq=maratha+sari&source=gbs_navlinks_sWiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.