धर्मेंद्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| धर्मेंद्र | |
|---|---|
| [[File:200px|250 px|alt=]] धर्मेंद्र |
|
| जन्म | धर्मेंद्र |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
चित्र:Sholay-Main Male Cast.jpg
शोले चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घेतलेले प्रकाशचित्र: (डावीकडून उजवीकडे)अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार व अमजदखान.
धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र (पंजाबी: ਧਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਦਿਉਲ ; हिंदी: धर्मेन्द्र ;) (डिसेंबर ८, इ.स. १९३५; साहनेवाल, पंजाब - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे तो अॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता. सनी देओल, बॉबी देओल व ईशा देओल ही त्याची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत.
धर्मेंद्राने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत तो राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभासदस्य बनला.
चित्रपट [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील धर्मेंद्रचे पान (इंग्लिश मजकूर)