द रोलिंग स्टोन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| द रोलिंग स्टोन्स The Rolling Stones |
|
मिक जॅगर, कीथ रिचर्ड्स, रॉनी वूड व चार्ली वॉट्स |
|
| संगीत प्रकार | रॉक, रिदम अँड ब्लूज, ब्लूज, रॉक अँड रोल |
| कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६२ ते चालू |
| संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
द रोलिंग स्टोन्स (इंग्लिश: The Rolling Stones) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बँड आहे. इ.स. १९६२ साली लंडनमध्ये ब्रायन जोन्स, इयन स्टुअर्ट मिक जॅगर, कीथ रिचर्ड्स, बिल रायमन व चार्ली वॉट्स ह्या विविध वाद्यनिपुण संगीतकारांनी ह्या बँडची स्थापना केली. रॉक, रिदम अँड ब्लूज, ब्लूज, रॉक अँड रोल ह्या प्रकारांमध्ये रचना करणारा व सुरुवातीच्या काळात ब्रिटनमध्ये लोकप्रिय असलेला रोलिंग स्टोन्स बँड लवकरच उत्तर अमेरिका खंडातदेखील झपाट्याने प्रसिध्दीत आला.
आजवर रोलिंग स्टोन्सच्या आल्बमची २० कोटीपेक्षा अधिक विक्री झाली आहे. अनेक तज्ज्ञ व अहवालांनुसार रोलिंग स्टोन्स हा जगातील आजवरच्या सर्वोत्तम संगीत बँडांमधील एक मानला जातो.
[संपादन] चमू
|
सध्याचा चमू
अतिरिक्त संगीतकार
|
माजी सदस्य
|
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- रोलिंग स्टोन्सचे अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
- द रोलिंग स्टोन्स. ऑलम्युझिक.कॉम. (इंग्लिश मजकूर)