देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख देवयानी नावाची हिंदू पुराणांतील व्यक्तिरेखा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देवयानी.
हिंदू पुराणांनुसार देवयानी ही असुरांचा पुरोहित शुक्राचार्य व जयंती यांची कन्या होती. आयुवंशातील राजा ययाति याची ती पत्नी होती. महाभारतात हिने बृहस्पतीचा पुत्र कच याच्यावर केलेल्या असफल प्रेमाची व त्यातून पुढे हिला ययातीशी विवाह करणे भाग पडल्याची कथा वर्णिली आहे. ययातीपासून हिला यदु व तुर्वसु या नावांचे दोन पुत्र झाले.