दुधी भोपळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेलीवरील दुधीभोपळा

दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) ;) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.

[संपादन] इतर वापर

दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये