थ्यॅन षान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
थ्यॅन षान पर्वतरांगेमधील ७,०१० मी उंचीचे खान टेंगरी हे शिखर
थ्यॅन षान (लेखनभेदः तियान शान, थ्यॅन शान; चिनी: 天山; फीनयीन: Tiān Shān ; मंगोलियन Тэнгэр уул; उय्गुर: تەڭرى تاغ ; अर्थ: दिव्य पर्वतरांगा) ही मध्य आशियातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. ७,४३९ मी. उंचीवरील चंगीश चोकुसू हे थ्यॅन षानमधील सर्वात उंच शिखर आहे.
थ्यॅन षान पर्वतरांग कझाकस्तान, किर्गिझस्तान व चीनच्या शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर पसरली आहे. हिच्या आग्नेयेस ताक्लामकान वाळवंट पसरले असून ही दक्षिणेस पामीर पर्वतरांगेस जोडली गेली आहे. तसेच हिचा एक भाग शिंच्यांग व पाकिस्तानच्या उत्तर भागातून हिंदुकुश पर्वतरांग पर्वतरांगेशी जोडला गेला आहे.
चित्रदालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- थ्यॅन षान पर्वतरांगेविषयी माहिती. कन्साइज ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया. (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत