तितली चक्रीवादळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तितली चक्रीवादळाचे उपग्रह छायाचित्र

तितली चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक चक्रीवादळ आहे.ते ओडिशाआंध्र प्रदेश या भारताच्या किनारपट्टीवर दि. ११-१०-२०१८ रोजी धडकेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.ते सन २०१८ च्या आजवरच्या इतिहासातील सर्वात तीव्र चक्रीवदळ आहे.या वादळाचा प्रभाव ओडिशाच्या गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा व जगतसिंगपूर या जिल्ह्यांंवर पडला.

या वादळामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम व विजयनगर जिल्ह्यात आठ लोक ठार झाले आहेत व ओडिशात एक व्यक्ती ठार झाली आहे.[१][२]वादळामुळे ओडिशात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकत आहे. वादळामुळे खूपशी वित्तहानीही झाली आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Cyclone Titli: 8 dead in Andhra Pradesh, one in Odisha" (इंग्लिश भाषेत). १२-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ [एनडीटीव्हीचे संकेतस्थळ "Cyclone Titli Hits Odisha Coast, Trees Uprooted; Flights, Trains Affected"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्लिश भाषेत). १२-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)