तपांबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वातावरणाचे थर. सर्वांत खाली तपांबर.

तपांबर (इंग्लिश: Troposphere, ट्रपॉस्फियर) हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे. अर्थातच यामुळे इतर वातावरणीय थरांपेक्षा या थरात हवेची घनता जास्त असते. तपांबराची जाडी विषुववृत्ताजवळ १५ कि.मी., तर ध्रुवीय प्रदेशांत १० कि.मी. आढळते [१].

ढग, पाऊस, विजांचा कडकडाट, हिमवृष्टी इत्यादी वातावरणीय घडामोडी तपांबरातच घडतात; यामुळे वातावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने तपांबरास विशेष महत्त्व आहे.

तापमान[संपादन]

भूपृष्ठाच्या संपर्कामुळे भूपृष्ठालगतच्या तपांबराचे तापमान अधिक असते आणि तपांबराची उंची जसजशी वाढत जाईल, तसतसे तापमान घटत जाते. सर्वसाधारणपणे दर किलोमीटर उंचीगणिक तपांबरातील तापमान ६.५ ° सेल्सियसांनी घटत जाते [१].

तपस्तब्धी[संपादन]

तपांबराच्या सर्वांत वरच्या भागात हवा विरळ असते आणि त्यामुळे तिथे उंचीनुसार तापमान बदलत नाही. म्हणून तपांबराच्या या विरळ सीमाक्षेत्रास तपस्तब्धी असे म्हणतात [१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ (जानेवारी, इ.स. २००९) कुलकर्णी,एल.के.: भूगोलकोश. राजहंस प्रकाशन. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.