तनुजा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तनुजा
पूर्ण नाव तनुजा मुखर्जी
(पूर्वाश्रमी तनुजा समर्थ)
जन्म २३ सप्टेंबर, इ.स. १९४३
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा हिंदी (अभिनय),
मराठी (मातॄभाषा)
वडील कुमारसेन समर्थ
आई शोभना समर्थ
पती शोमू मुखर्जी
अपत्ये काजोल, तनिशा

तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ, (२३ सप्टेंबर, इ.स. १९४३; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना समर्थ या बोलपटांच्या आरंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील वर्तमान पिढीतल्या अभिनेत्री आहेत.

थोरली बहीण नूतन हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या हमारी बेटी या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजेने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरूण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या छबेली या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. बहारें फिर भी आयेंगी (इ.स. १९६६), ज्वेल थीफ (इ.स. १९६७), अनुभव (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये