टिबुकली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टिबुकली
Little Grebe (Tachybaptus ruficollis)- Non-breeding- preening after bath in an Indian Lotus (Nelumbo nucifera) Pond in Hyderabad, AP W IMG 7611.jpg
शास्त्रीय नाव Tachybaptus ruficollis (Pallas),
Podiceps ruficollis capensis
कुळ ग्रीबाद्य (Podicipedidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Little Grebe or Dabchick
संस्कृत लघु रक्तकंठक
हिंदी छोटी पनडुब्बी, चुरका

अनुक्रमणिका

[संपादन] आकार

टिबुकली(डॅबचिक) हा साधारण कबुतराएवढा (२३ ते २९ सें. मी.) पाठीचा भाग भुर्‍या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढर्‍या रंगाचा, शेपटी नसलेला, गुबगुबीत पाणपक्षी आहे. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात तर विणेच्या काळात नराच्या डोक्याचा आणि मानेचा रंग गडद तपकिरी होतो.

[संपादन] वास्तव्य

टिबुकली संपूर्ण भारतासह, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान येथे जोडीने किंवा लहान थव्यात लहान-मोठ्या तलावात, झिलाणीत राहतात.

[संपादन] आढळस्थान

समुद्र सपाटीपासून सुमारे २५०० मी. उंचीपर्यंत सर्वत्र आढळतो.

[संपादन] प्रजाती

याच्या रंग आणि आकारावरून किमान नऊ उपजाती आहेत. भारतात आढळणारी एकमेव उपजात Tachybaptus ruficollis capensis ही आहे.

[संपादन] खाद्य

टिबुकली पाणकीटक, बेडूक, अळ्या व इतर छोटे जलचर खाणारा पक्षी आहे. याचे घरटेही पाण्यात तरंगणारे व छोटे असते. ते काटक्यांचे बनविलेले असते.

[संपादन] प्रजनन काळ

विणीचा हंगाम एप्रिल ते ऑक्टोबर असून मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढर्‍या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

[संपादन] चित्रदालन


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये