ज्ञानदा कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्ञानदा कदम
जन्म मुंबई
११ मे १९८७
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए.
प्रशिक्षणसंस्था
  • गांधी बाल मंदिर हायस्कूल, मुंबई
  • व्ही. जी. वाजे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
कारकिर्दीचा काळ १ मार्च २००७ पासून - चालू (एबीपी माझा)
मूळ गाव कणकवली, सिंधुदुर्ग
पदवी हुद्दा वृत्तनिवेदिका
वडील अरविंद चव्हाण
पुरस्कार न्यूझ टेलिव्हिजन पुरस्कार (NT अवॉर्ड), वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड (२०१९)


ज्ञानदा कदम ही मराठी वृत्तनिवेदिका असून ती सध्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीसाठी काम करते. तिच्या वक्तृत्व शैलीमुळे "काय सांगशील ज्ञानदा?" हे समाज माध्यमावर बऱ्याच काळ ट्रेडिंग वर होते.[१]

सुरुवातीचे दिवस[संपादन]

कदम यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव अरविंद चव्हाण आहे. तिचे आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, आजी शिक्षिका होती. तिचे मूळ कुटुंब कणकवली, सिंधुदुर्ग येथील आहे . तिला एक संपदा चव्हाण नावाची बहीण ती अमेरकेत वास्तव्यास आहे. [२]

शिक्षण[संपादन]

कदम यांचेचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या गांधी बालमंदिर हायस्कूल येथे झाले असून बालपणी तिचा खोडकर स्वभाव होता. बालपणीपासूनच तिला भविष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा होती. तिने मुंबईच्या व्ही .जी. वाजे कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. तिने वॉइस कल्चरवर कोर्स पूर्ण केला आहे. [३]

कार्यक्षेत्र[संपादन]

कदम यांना १ मार्च २००७ मध्ये एबीपी माझा या न्यूझ चॅनेल मध्ये नोकरी मिळाली. तेव्हापासून त्या एबीपी माझा (पूर्वी स्टार माझा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) मुख्य वृत्तनिवेदिका (लीड न्यूझ अँकर) म्हणून काम करत आहेत. त्या ऑन फील्ड न्यूझ रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध होत्या. त्यानंतर एबीपी माझा निर्माता राहुल यांच्या विनंतीनंतर त्यांनी न्यूझ अँकरिंगमध्ये प्रवेश केला. ज्ञानदा कदम प्राइमटाइम शो “माझा कट्टा” आयोजित करतात. एबीपी माझा रणसंग्राम, मराठी बिग बॉस या प्रमुख कार्यक्रमांपैकी त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. एबीपी माझामध्ये येण्याआधी तिने ८ महीने आकाशवाणीसाठी काम केले होते.[४]

पुरस्कार[संपादन]

कदम यांना न्यूझ टेलिविजन अवॉर्ड (NT अवॉर्ड) प्राप्त झाला आहे. २०१९ साली तीनणा "वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड" मिळाला . [५]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "माध्यमी: थ्री. टू. वन. क्यू!". लोकसत्ता. 2022-04-28 रोजी पाहिले.
  2. ^ "ज्ञानदा कदम यांची माहिती – Dnyanada Kadam Biography in Marathi". Marathi Biography (इंग्रजी भाषेत). 2020-04-18. 2022-04-28 रोजी पाहिले.
  3. ^ "ज्ञानदा कदम | Biography in Marathi" (इंग्रजी भाषेत). 2020-04-24. 2022-04-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Dnyanada Kadam - Bio, Age, Net Worth, Salary, Height, Married, Career". Biography Mask (इंग्रजी भाषेत). 2021-05-16. 2022-04-28 रोजी पाहिले.
  5. ^ "ज्ञानदा कदम | Biography in Marathi" (इंग्रजी भाषेत). 2020-04-24. 2022-04-28 रोजी पाहिले.