आकाशवाणी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑल इंडिया रेडियो (संक्षिप्तपणे AIR), अधिकृतरीत्या ज्याला आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडियो प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे.
आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडियो प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय आकाशवाणी भवन, नवी दिल्ली येथे आहे. आकाशवाणी भवनात नाट्य, एफ.एम. व राष्ट्रीय सेवा असे विभाग आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
भारतात रेडियो प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले. मात्र प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडियो यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागा अंतर्गत ’भारतीय राज्य प्रसारण मंडळ’ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे ’ऑल इंडिया रेडियो’ असे नामकरण करुन दूरसंचार विभागा अंतर्गत याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडियो’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडियो’चे अधिकृतरित्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले जे प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.
जरी १९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडियो प्रसारणात उतरल्या असल्या तरीही ’आकाशवाणी’ अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या कुठल्याही कोपर्यात असलेली याची उपलब्धता.
[संपादन] कार्यक्षेत्र
आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोचते. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.
इतर कुठल्याही प्रसारणापेक्षा (जसे की दूरदर्शन) रेडियो संग्राहक स्वस्त असल्यामुळे आकाशवाणी हे आजही तितकेच प्रसिद्ध आहे. आकाशवाणीच्या एकूण २२९ प्रसारण केंद्रांपैकी १४८ केंद्रे ही मध्यमतरंग, ५४ केंद्रे ही लघुतरंग तर उरलेली १६८ ही एफ.एम. केंद्रे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताचा ९१.७९% भागात सेवा पुरविते.
[संपादन] इतर माहिती
’दिल से’ या हिंदी चित्रपटातले बरेच प्रसंग हे आकाशवाणीच्या मुख्यालयाच्या आसपास चित्रीत झालेले आहेत. तसेच ’रंग दे बसंती’ या चित्रपटात सुद्धा आकाशवाणीच्या प्रसारणाचा उपयोग केल्याचे दर्शविण्यात आलेले आहे.
[संपादन] सेवा
आकाशवाणी भारताच्या विविध प्रदेश / भाषांप्रमाणे अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते. ’विविध भारती’ ही या सर्व सेवांमधली एक प्रमुख सेवा आहे. ही सर्वात जास्त व्यावसायिक तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सेवा आहे. या वाहिनीवर विविध प्रकारच्या बातम्यांबरोबरच चित्रपट संगीत, विनोदी कार्यक्रम, इ. प्रसारित केले जातात.
विविध भारतीवर प्रसारित केले जाणारे काही कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
- हवा-महल
- संतोगेकी मेहफिल
खाली आकाशवाणी विविध प्रसारण सेवांपैकी काही दिलेल्या आहेत.
[संपादन] उत्तर क्षेत्र सेवा
- आग्रा - १५३० किलो हर्टझ
- अलाहाबाद - १०२६ कि.ह.
- दिल्ली ’इंद्रप्रस्थ’ - ८१९ कि.ह.
- दिल्ली ’राजधानी’ - ६६६ कि.ह.
- दिल्ली ’ड’ - १०१७ कि.ह.
- जयपूर ’अ’ - १४७६ कि.ह.
- जालंधर ’अ’ - ८७३ कि.ह.
- जम्मू ’अ’ - ९९० कि.ह.
- जोधपूर ’अ’ - ५३१ कि.ह.
- लखनौ’अ’ - ७४७ कि.ह.
- श्रीनगर ’अ’ - १११६ कि.ह.
- वाराणसी ’अ’ - १२४२ कि.ह.
[संपादन] पूर्व क्षेत्र सेवा
- भागलपूर - १४५८ कि.ह.
- कटक ’अ’ - ९७२ कि.ह.
- दरभंगा - १२९६ कि.ह.
- जमशेदपूर - १५८४ कि.ह.
- कलकत्ता ’अ’ - ६५७ कि.ह.
- कलकत्ता ’ब’ - १००८ कि.ह.
- कलकत्ता ’क’ - १३२३ कि.ह.
- पटणा ’अ’ - ६२१ कि.ह.
- रांची ’अ’ - ५४९ कि.ह.
- कलकत्ता रेनबो - १०७ एफ.एम.
- कलकत्ता गोल्ड - १००.२ एफ.एम.
[संपादन] उत्तर-पूर्व क्षेत्र सेवा
[संपादन] पश्चिम क्षेत्र सेवा
- अहमदाबाद ’अ’ - ८४६ कि.ह.
- औरंगाबाद - १५२१ कि.ह.
- भोपाल ’अ’ - १५९३ कि.ह.
- ग्वालियर - १३८६ कि.ह.
- इंदोर ’अ’ - ६४८ कि.ह.
- जळगांव - ९६३ कि.ह.
- मुंबई ’अ’ - १०४४ कि.ह.
- मुंबई ’ब’ - ५५८ कि.ह.
- नागपूर ’अ’ - ५८५ कि.ह.
- पणजी ’अ’ - १२८७ कि.ह.
- पुणे ’अ’ - ७९२ कि.ह.
- राजकोट ’अ’ - ८१० कि.ह.
- रत्नागिरी - ११४३ कि.ह.
- सोलापूर - १६०२ कि.ह.
- सांगली - १२५१ कि.ह.
[संपादन] दक्षिण क्षेत्र सेवा
- आदिलाबाद - १४८५ कि.ह.
- बंगलोर ’अ’ - ६१२ कि.ह.
- चेन्नई ’अ’ - ७२० कि.ह.
- गुलबर्गा - ११०७ कि.ह.
- हैद्राबाद ’अ’ - ७३८ कि.ह.
- हैद्राबाद ’ब’ - १३७७ कि.ह.
- कोझिकोड ’अ’ - ६८४ कि.ह.
- मदुराई - १२६९ कि.ह.
- उटकमंड - १६०२ कि.ह.
- पाँडिचेरी - १२१५ कि.ह.
- पोर्ट ब्लेअर - ६८४ कि.ह.
- तिरुवनंतपुरम ’अ’ - ११६१ कि.ह.
- तिरुचिरापल्ली ’अ’ - ९३६ कि.ह.
- विजयवाडा ’अ’ - ८३७ कि.ह.
- विशाखापट्टनम - ९२७ कि.ह.
[संपादन] विविधभारती सेवा
- चेन्नई ’क’ - ७८३ कि.ह.
- कटक ’ब’ - १३१४ कि.ह.
- दिल्ली ’क’ - १३६८ कि.ह.
- हैद्राबाद ’क’ - १०२.८ मेगा हर्टझ
- जालंधर ’क’ - १३५० कि.ह.
- कानपूर - १४४९ कि.ह.
- कलकत्ता ’क’ - १३२३ कि.ह.
- लखनौ ’क’ - १२७८ कि.ह.
- मुंबई ’क’ - ११८८ कि.ह.
- पणजी ’ब’ - १५३९ कि.ह.
- विजयवाडा ’ब’ - १५०३ कि.ह.
- वाराणसी ’ब’ - १६०२ कि.ह.
[संपादन] बाह्य सेवा
आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग एकंदर २७ भाषांमध्ये प्रसारण करते. हे प्रसारण मुख्यत: लघुतरंगांच्या माध्यमातून बाहेरील देशांमध्ये केले जाते. ’सामान्य बाह्य प्रसारण सेवा’ ही इंग्रजी मध्ये ८ १/४ तास सेवा देणारी प्रमुख सेवा आहे.
[संपादन] युव वाणी : युवकांचा आवाज
युव वाणी सेवा ही युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली सेवा आहे. युव वाणी ही अनेक दिग्गजांसाठी सुरवात करण्याची जागा होती. उदा. प्रफुल ठक्कर, रोशन अब्बास, गौरव कपूर, कौशल खन्ना, इ.
[संपादन] दूरध्वनीवर बातम्या
आकाशवाणीने २५ फेब्रुवारी १९९८ साली दूरध्वनीवर बातम्या ही सेवा दिल्लीमध्ये सुरू केली. सध्या ही सेवा चेन्नई, मुंबई, हैद्राबाद, पटणा व बंगलोर या शहरांमध्ये सुरू आहे. लवकरच ही सेवा अहमदाबाद, गुवाहाटी, इंफाळ, जयपूर, कलकत्ता, लखनौ, रायपूर, सिमला व तिरुवनंतपुरम इथे सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आकाशवाणीने याच सेवेचा एक भाग म्हणून माहितीजालावर सुद्धा ही सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रत्येक तासाच्या इंग्रजी व हिंदी बातम्या या दुव्यावर उपलब्ध आहेत. लिखीत स्वरुपातील बातम्या सुद्धा याच संकेतस्थळावर ९ प्रादेशिक भाषांमधून (तमिळ, कन्नड, गुजराथी, बंगाली, मराठी, असामी, पंजाबी, तेलुगु, उर्दू) उपलब्ध आहेत.