जी.ए. कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जी. ए. कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी उर्फ "'जी.ए.'"(जन्म : १० जुलै १९२३; - ११ डिसेंबर १९८७) हे मराठी लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.

जीवन[संपादन]

जी. ए. कुलकर्णी यांचे कोथरूड पुणे परिसरातील निवासस्थान

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म ३० जुलै १९२३ की २ मार्च १९२२?, रोजी झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य धारवाड येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये ते इंग्लिशचे प्राध्यापक होते. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जातात. त्यांचे निधन ११ डिसेंबर १९८७]] रोजी झाले.

मराठीतील प्रसिद्ध लेखिका आणि पु. ल. देशपांडे याच्या पत्नी सुनिता देशपांडे आणि प्रा. जी. ए. कुलकर्णी यांची साहित्यिक मैत्री प्रगाढ होती. त्या मैत्रीसंबंधी 'आहे मनोहर तरी' या सुनिताबाईंच्या आत्मचरित्रात उल्लेख सापडतात. कोथरुड येथील सदर वरच्या नोंदीत चित्र दिलेले त्यांचे निवासस्थान त्यांनी कधी आणि का घेतले होते ते ज्ञात नाही. त्या निवासस्थानातून ते कधी आणि किती काळ राहिले आणि त्याची आजची स्थिती काय आहे हे देखील ज्ञात नाही.

जी.ए . कुलकर्णी चे पहिले पुस्तक[संपादन]

जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कथासंग्रहासाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार,पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.

प्रकाशित साहित्य[संपादन]

जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झाल्या. सत्यकथेमधे त्यांच्या एकूण ३१ कथा प्रसिद्ध झाल्या. ह्या कथांचे नाव, सत्यकथेतील पृष्ठ क्र.,महिना व वर्ष खालीलप्रमाणे :

अवशेष/३५/सप्टेंबर १९५५; अस्तिस्तोत्र/४/ऑगस्ट १९७१; ऑर्फियस/३/सप्टेंबर १९७३; काकणे/१९/नोव्हेंबर १९५८; कागदाचा तुकडा/४१/डिसेंबर १९४०; गुंतवळ/६/जुलै १९५५; गुलाबाची फुले/३८/जुलै १९४२; चंद्रावळ/४/डिसेंबर१९५५; जीवन चित्रे/५०/जुलै1१९५०; डायरीची कथा/१७/मे+जून १९४२; दीक्षा/ /सप्टेंबर१९७०; देवपूजा/२/जानेवारी १९४२; नाग/४/१९५७; पगाराचा दिवस/४५/फेब्रुवारी १९४२; पडदा/४८/एप्रिल १९५५; पत्रिका/१९/ऑगस्ट १९७०; प्रवासी(दीर्घकथा)/८२/ऑक्टोबर १९७१; प्रसाद/३/ऑक्टोबर १९७४; भिंतीतून जाणारा माणूस/८५/नोव्हेंबर १९५०; माणूस नावाचा बेटा/४/ऑगस्ट १९५९; मुखवटा/३५/सप्टेंबर १९५६; यात्रिक//ऑगस्ट १९७५; राणी/१९/जून १९५५; लिरा/२/मार्च १९४२; वहाणा/५/एप्रिल १९५६; शलॉट/१९/नोव्हेंबर१९५९; सांगाती/१९/ऑक्टोबर१९७०; हल्लीच्या मुली/२१/मार्च १९४१; ह्रदयातील अश्रू/८/ऑक्टोबर१९४२; हिरवी मखमल गोरा हात/४१/ऑक्टोबर१९५७; क्षुद्र/२/डिसेंबर“९३१.

त्यांचे सर्व कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे :

शीर्षक साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशनवर्ष (इ.स.) भाषा
अमृतफळे अनुवादित कथा[१] कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे इ.स. १९८० मराठी
आकाशफुले कथासंग्रह
(अनुवादित, रूपांतरित, आधारित कथा)
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई २९ सप्टेंबर, इ.स. १९९० मराठी
एक अरबी कहाणी अनुवादित कादंबरी विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे ८ ऑक्टोबर, इ.स. १९८३ मराठी
A Journey Forever इंग्रजी
A Journey Forever Iskilaar And Other Stories इंग्रजी
ओंजळधारा कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे इ.स. १९८१ मराठी
काजळमाया कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९७२ मराठी
कुसुमगुंजा कथासंग्रह परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई[२] १० जुलै १९८९ मराठी
गाव अनुवादित कादंबरी परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई १५ जानेवारी १९६७ मूळ इंग्रजी लेखक - कॅनराड रिक्टर
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड १[३] पत्रसंग्रह मौज प्रकाशन गृह, मुंबई १० जुलै १९९५ मराठी
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड २[३] पत्रसंग्रह मौज प्रकाशन गृह, मुंबई १० जुलै १९९८ मराठी
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ३[४] पत्रसंग्रह मौज प्रकाशन गृह, मुंबई १० जुलै २००६ मराठी
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ४[४] पत्रसंग्रह मौज प्रकाशन गृह, मुंबई १० जुलै २००६ मराठी
डोहकाळिमा[५] कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९८७ मराठी
दिवस तुडवत अंधाराकडे नाटक अप्रकाशित इ.स. १९५३ मराठी
निळासावळा कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १४ जानेवारी १९५९ मराठी
पारवा कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई सप्टेंबर १९६० मराठी
पिंगळावेळ कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९७७ मराठी
पैलपाखरे कथासंग्रह
(चार अनुवादित दीर्घकथा)
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई १० जुलै १९८६ मराठी
बखर बिम्मची बाल-किशोरसाहित्य परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई २६ नोव्हेंबर १९८६ मराठी
माणसे-अरभाट आणि चिल्लर आत्मचरित्रपर ललितलेखन परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई ११ मार्च १९८८ मराठी
मुग्धाची रंगीत गोष्ट बाल-किशोरसाहित्य परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई २६ नोव्हेंबर १९८६ मराठी
रक्तचंदन कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई सप्टेंबर १९६६ मराठी
रमलखुणा कथासंग्रह कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे जून १९७५ मराठी
रान अनुवादित कादंबरी परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई इ.स. १९६७ मराठी
रानातील प्रकाश अनुवादित कादंबरी परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई ३० जुलै १९६८ मूळ इंग्रजी लेखक - कॅनराड रिक्टर
लॉर्ड ऑफ दी फ्लाईज अनुवादित कादंबरी पॉप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९८७ मराठी
वैऱ्याची एक रात्र अनुवादित आत्मकथा, मूळ : आय सर्व्हाइव्ड हिटलर’स ओव्हन्स (इंग्रजी लेखिका -ओल्गा लेंग्येल) विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे २२ मे १९८२ मराठी
शिवार अनुवादित कादंबरी परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई इ.स. १९६८ मराठी
सांजशकुन कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९७५ मराठी
सोनपावले कथासंग्रह परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई ११ डिसेंबर १९९१ मराठी
सोन्याचे मडके अनुवादित कादंबरी विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे ११ डिसेंबर १९९१ मराठी
स्वातंत्र्य आले घरा अनुवादित कादंबरी परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई ३० जून १९६८ मराठी
हिरवे रावे कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशन, मुंबई सप्टेंबर १९६२ मराठी

अन्य भाषांमध्ये अनुवाद[संपादन]

  • नियतिदान - संपादक म.द.हातकणंगलेकर, निशिकांत मिरजकर; जी.ए. मित्रमंडळ प्रकाशन; १९९२. वितरण : पॉप्युलर प्रकाशन, नई दिल्ली. जी.एं.च्या काही कथांचे हिंदी अनुवाद.
  • नाशिक शहरातील इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विलास साळुंके यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या तीन पुस्तकांचे A Journey Forever, ‘शॅडोज इन द डेझर्ट’ आणि ‘विदूषक अँड अदर स्टोरीज’ या नावाचे इंग्रजी अनुवाद केले आहेत.

जीएंवरील पुस्तके[संपादन]

  • अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन (वि.गो. वडेर)
  • एक धारवाडी कहाणी (अनंत व आनंद अंतरकर)
  • जीएंची कथा : परिसरयात्रा (डाॅ. अ.रा. यार्दी , वि.गो. वडेर)
  • जी.एं.च्या कथा : एक अन्वयार्थ (धों.वि. देशपांडे)
  • जीए दर्शन (वि.गो. वडेर)
  • जीएंची पत्रवेळा...(जी.ए. कुलकर्णी)
  • जी.ए. पत्रास विनाकारण की (महेश आफळे)
  • जीएंच्या रमलखुणा (विजय पाडळकर)
  • प्रिय बाबुअण्णा (नंदा पैठणकर)
  • Best Of G. A. Kulkarni (इंग्रजी, श्रीकृष्ण डी. पंडित)

पत्रव्यवहार[संपादन]

  • तत्कालीन साहित्यिक वर्तुळांत, कार्यक्रमांत प्रत्यक्ष ऊठबस जाणीवपूर्वक टाळणाऱ्या जी.एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी आप्‍तांना, मित्रांना लिहिलेली पत्रे संपादित करून त्यांचे चार खंड 'जीएं.ची निवडक पत्रे' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या सुनीता देशपांडे यांना लिहिलेल्या दीर्घपत्रांचा संग्रह म्हणजे पहिला खंड. दुसरा खंड सत्यकथेचे-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांना लिहिलेल्या पत्रांचा आहे. उरलेले दोन खंड माधव आचवल (जी.एं.चे अंतरंग मित्र), म.द. हातकणंगलेकर, कवी ग्रेस, जयवंत दळवी अशा मित्रांना लिहिलेल्या पत्रांचे आहेत. या पत्रांमुळे जी.एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते.
  • जीए आणि अनंत व आनंद अंतरकर यांच्यांमधील पत्रव्यवहार ’एक धारवाडी कहाणी’ नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला आहे. जीएंचे पत्रसाहित्य वाचणे हा उच्च प्रतीचा आनंद आहेच, शिवाय हे साहित्य पुढील पिढ्यांच्या वाङ्‌मयीन अभ्यासाठी उपयुक्त आणि मोलाचा ठेवा आहे. हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

आठवणी[संपादन]

  • ’प्रिय बाबुअण्णा’ या नावाच्या पुस्तकाद्वारे जी.एं.च्या मावसभगिनी नंदा पैठणकर यांनी जी.एं.च्या आठवणी सांगितल्या आहेत.

अर्पणपत्रिका आणि परिसरयात्रा[संपादन]

जी.ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका वैशिष्ट्यपूर्ण असत. त्या अर्पण पत्रिकांवर संशोधन करून जीएंचे नातलग, सहकारी, सहाध्यायी प्राध्यापक यांच्याबद्दलची माहिती गोळा करून वि.गो. वडेर यांनी ‘अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. जीएंची खरी जन्मतारीख २ मार्च १९२२ असल्याचे वि.गो. वडेर यांनी या पुस्तकात (पृष्ठ ५९ते ६२) सप्रमाण सिद्ध केले आहे.

  • ‘जीएंची कथा : परिसरयात्रा’ हेही पुस्तक वि.गो. वडेर यांनी (सहलेखक- ए.आर. यार्दी) लिहिले आहे.
  • जी.ए. कुलकर्णी यांच्या ९४व्या जन्मदिनाचे औचित्य साधून १० जुलै २०१७ रोजी महेश आफळे यांचे ‘जी.ए. पत्रास विनाकारण की’ नावाचे पुस्तक प्रकशित झाले आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ लिऑन सर्मेलियन (इंग्लिश: Leon Surmelian) याच्या अ‍ॅपल ऑफ इम्मॉरटॅलिटी (इंग्लिश: Apple of Immortality) पुस्तकातील काही अनुवादित कथा.
  2. ^ संपादक म.द. हातकणंगलेकर; निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन या चार कथासंग्रहातील निवडक कथा.
  3. ^ a b संपादक: म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत.
  4. ^ a b संपादक: म.द. हातकणंगलेकर, सु.रा. चुनेकर, श्री.पु. भागवत.
  5. ^ संपादक म.द.हातकणंगलेकर; जी.एं.च्या अप्रकाशित, व प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्याचे संकलन.

बाह्य दुवे[संपादन]