चिन्मय मिशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिन्मय मिशन ही इ. १९५३ मध्ये स्थापलेली एक आध्यात्मिक, शैक्षणिक व धार्मिक संस्था आहे. तिचे व्यवस्थापन सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टाद्वारे होते. स्वामी चिन्मयानंदांनी केलेल्या कार्याला संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी या मिशनाची स्थापना केली. सध्या भारतभरात व जगात अन्यत्र याची ३०० हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.

चिन्मय मिशनाद्वारे वेदान्त प्रशिक्षण, बाल विहार, चिन्मय युवा केंद्र, सेंट्रल चिन्मय वानप्रस्थ संस्थान, देवी मंडळ, भजनमंडळ, विद्यालय व महाविद्यालय, पितामह सदन (वृद्धाश्रम), पुस्तक प्रकाशन इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम चालवले जातात.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.