चर्चा:राधा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या लेखातील आधीचा सर्व मजकूर हा खूप गोंधळात टाकणारा तसेच वाक्यांचा परस्परसंबंध नसलेला असा होता. त्यामुळे मी आधीचा सर्व मजकूर काढून टाकून लेख नव्याने लिहायला सुरुवात करीत आहे आणि जुन्या लेखात तो लेख तसाच ठेऊन सुधारणा करणे किंवा भर घालणे हे अतिशय कठीण वाटले.आर्या जोशी (चर्चा) ०९:४२, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: नमस्कार! या लेखाला दोन साचे लावले आहेत. मी आधीचा लेख सुधारून हा नवा लेख टायगर लेखन स्पर्धेसाठी सादर करीत आहे. त्यापूर्वी हे साचे काढता येतील का? धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १३:०२, ४ मे २०१८ (IST)[reply]

विस्तार झाल्याने हा साचा काढायला हरकत नाही.तसेच आपण या लेखाचे अविश्वकोषीय स्वरूपही बदलले आहे.तोही साचा अनावश्यक आहे.स्पर्धेसाठी जरूर सदर करावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:४१, ४ मे २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १६:२६, ६ मे २०१८ (IST)[reply]


@संदेश हिवाळे: नमस्कार! आपण या लेखाचा तत्वज्ञान हा साचा काढला आहे. खर तर राधा ही केवळ व्यक्ती नसून वैष्णव संप्रदायाच्या आणि भारतीय तत्वज्ञानात ती एक महत्वाची संकल्पना म्हणून अभ्यासली आणि पुजली जाते. जगभरात ही धारणा अभ्यासक मान्य करतात म्हणूनच तो वर्ग घातला आहे. लेखनातही तसा एक परिच्छेद तुम्हाला दिसेल. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १६:२५, ६ मे २०१८ (IST)[reply]

लेखातील तत्त्वज्ञान विषयक परिच्छेदात – भारतीय तत्त्वज्ञानाची महत्त्त्वाची संकल्पना म्हणजे परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. या तत्त्वाला अनुसरून राधा ही जणू काही कृष्णच आहे अशा परिभाषेत राधा आणि कृष्ण यांचे ऐक्य दाखविले जाते. हा मजकूर आहे. यातून राधा ही/हे एक 'तत्त्वज्ञान' किंवा 'तत्त्वज्ञान विषयक संकल्पना' असल्याचे दिसत नाही. या मजकूरात परमेश्वर प्रत्येक गोष्टीत आहे, अगदी राधेसह सर्वांमध्ये हेच दिसते. पण तुम्हाला वर्ग जोडायचा असल्यास माझी हरकत नाही, पण एकदा यावर @सुबोध कुलकर्णी: यांचे मत घ्यावे, अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १६:५०, ६ मे २०१८ (IST)[reply]

मी लेखातून तत्वज्ञान काढत आहे. @आर्या जोशी: कृपा विश्वसनीय स्रोत नमूद करा. चर्चा शिवाय हा वर्ग या लेखात घालू नये. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४३, ७ मे २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:नमस्कार! तुमची शंका स्वाभाविक आहे. कृपया या लेखाला दिलेल्या प्रत्येक पुस्तकाची लिंक आपणही पहा आवर्जून. google books चे सर्व संदर्भ मुळातून पहा. मला नाही वाटत की यापेक्षा अधिक संदर्भ तत्वज्ञान हा मुद्दा अधोरेखित होण्याला आवश्यक आहेत.आर्या जोशी (चर्चा) १७:२८, ७ मे २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: या लेखाला तत्वज्ञान असा वर्ग लावताना दोन संपादकांनी शंका उपस्थित केली आहे, आणि चर्चा करून मग तो वर्ग लावावा असे नमूद केले आहे टायवीन यांनी. आपणा दोघांना विनंती की आपलेही मत नोंदवा. तत्वज्ञान हा माझा अभ्यासविषय आहे म्हणून मला त्याविषयी खात्री आहे, पण आपल्यासारख्या जाणकार व्यक्तीनीही आपले मत याविषयी नोंदविलेले उचित वाटते. google books चे संदर्भ आपणही पहा. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ०९:१७, ८ मे २०१८ (IST)[reply]

व्यक्तीविषयक लेखाला तत्त्वज्ञान वर्ग कसा लागू होऊ शकतो? आणि एखादी व्यक्ती तत्त्वज्ञान वर्गात कशी मोडू शकते? (तत्त्वज्ञ मध्ये मोडू शकेल.) बुद्ध, ख्रिस्त, शंकराचार्य, मार्क्स, गांधी, आंबेडकर इ. यांना तत्त्वज्ञान वर्ग लागू नाही, पण बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद इ. तत्त्वज्ञान मध्ये मोडू शकते. वैष्णव संप्रदायात राधेला काही विशेष महत्त्व आहे, आणि वैष्णव संप्रदाय हा तत्त्वज्ञान मध्ये मोडू शकतो, पण म्हणून काय राधेलाही तत्त्वज्ञान मानायचे का? या लेखात राधा कशाप्रकारे तत्त्वज्ञान आहे, याबाबत काहीही नाही. तत्त्वज्ञानाची एक विशिष्ठ विचारधारा वा सिद्धांत असतो, तसे 'राधा तत्त्वज्ञान' बाबत काय सिद्धांत आहे? तत्त्वज्ञान हा व्यक्ती साठी लागू होत नाही, मग ती व्यक्ती कुठल्याही काळातील, पंथातील वा तत्त्वज्ञान विषयक संकल्पनेतील असो. व्यक्ती ही तत्त्वज्ञ असू शकते. 'राधा' या तत्त्वज्ञानाचे सिद्धांत नेमके काय काय आहेत, लेखात नमूद करावेत.--संदेश हिवाळेचर्चा १०:४४, ८ मे २०१८ (IST)[reply]
तत्त्वज्ञानाबद्दलच्या माझ्या सीमित अभ्यास व ज्ञानानुसार राधा ही जशी एक व्यक्ती आहे तसेच एक संकल्पनाही आहे.
व्यक्ती राधा ही गोकुळातील एक गौळण होती व कृष्णसखी होती. तिचे कृष्णावर जीवापाड प्रेम होत व त्यापायी ती सर्व जग विसरुन जायची.
राधा ही संकल्पना कोणत्याही देव/दैवत/व्यक्ती वर असेच प्रेम करणाऱ्या व्यक्तीस लागू होते, उदा - मीराबाई आणि नरसी मेहता स्वतःला राधा म्हणवून घेत. आधुनिक काळातील अनेक गुरू/बाबा/आचार्य स्वतःला किंवा त्यांच्या भक्तांना राधा म्हणवून घेत असल्याचे उघडच आहे.
गांधी, कांट, शॉपेनहाउअर हे तत्त्वज्ञानाचे प्रणेते आहेत, तत्त्वज्ञानाचा विषय नाहीत.
असे असता राधा हा लेख तत्त्वज्ञान वर्गात मोडू शकतो.
अर्थात तत्त्वज्ञान विषयात गाढा अभ्यास असलेले आर्या जोशी व इतर सदस्य आणि त्यांनी दिलेले संदर्भ यातून याचे अधिक स्पष्ट विवेचन करू शकतील.
अभय नातू (चर्चा) २२:३६, ८ मे २०१८ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:@अभय नातू: नमस्कार! मला इथे कोणताही तत्वज्ञान या विषयाचा माझा अभ्यास मांडावा असे वाटत नाही. आपण दोघांनी आपापल्या दृष्टीने उचित मुद्दे मांडले आहेत. आता पुन्हा मुद्दा असा येतो की जर मूळ संपादक व्यक्ती ही त्या विषयाचीच अभ्यासक असेल तर अन्य कोणी अधिक त्यावर नोंदवावे का? आणि त्यावर खल करीत बसावे का? ही प्रश्नपत्रिका सोडवत नाही आहोत आपण, त्यामुळे सामंजस्याने स्वीकारण्याचा हा मुद्दा आहे. काही विषय हे अभ्यासातूनच कळतात . त्यामुळे जे मला अभ्यासून माहिती नाही तिथे मी प्रश्न उपस्थित करीत नाही इतरांकडेही. विषयाला औचित्यपूर्ण संदर्भ दिले आहेत ना हे मात्र तपासणे गरजेचे वाटते मलाही. अंतिमतः: मी मला यौग्य वाटत असल्याने तुमच्या सूचनांचा विचार करून थोडा बदलून साचा वापरते आहे. परस्परांच्या अभ्यासाचा आदर न करता वाद उपस्थित करीत राहिलो तर यासाठी स्वतंत्र अभ्यासक मार्गदर्शक नेमण्याची वेळ येईल उद्या आपल्या सर्वावरच. असो. धन्यवाद !

@आर्या जोशी:
सर्वप्रथम, मराठी (किंवा कोणत्याही) विकिपीडियावर मूळ संपादक कोण असा प्रश्न पडतो. लेख तयार करुन त्यात दोन ओळी लिहिणारी व्यक्ती? त्रोटक माहिती असलेल्या लेखात अधिक भर घालणारी व्यक्ती? असलेला मजकूर तपासून, सुधारुन उपयुक्त करणारी व्यक्ती? संदर्भ देणारी व्यक्ती?
त्यानंतर अभ्यासू संपादक म्हणजे काय हा ही उचित प्रश्न आहे. यासाठी निकष काय? पदवी, डॉक्टरेट, १० वर्षांचा अनुभव, २५? मग २५ वर्षे ललितलेख लिहिलेल्या लेखकाचे पारडे जड कि भाषाशास्त्रात पीएचडी असलेल्याचे?
असे प्रश्न सोडविण्यापेक्षा विकिपीडियाने लिखाण मुक्त करायचे ठरविले.
विकिपीडियाच्या तत्त्वांनुसार एखाद्या लेखातील मजकूरावर कोणीही काम करू शकतो. त्यासाठी विद्वान असण्याची गरज नाही, किंबहुना पारंपारिक ज्ञानकोश आणि विकिपीडियातील हा मोठा फरक आहे (अर्थात याला खोडसाळपणे केलेले बदल अपवाद आहेत.) असे बदल करताना संदर्भ देणे गरजेचे आहे. ही गरज अभ्यासपूर्ण किंवा क्लिष्ट विषयांतील लेखांमध्ये अधिक आहे.
नील डिग्रास टायसनने कृष्णविवरावर लेख लिहिला (किंवा सुधारला) तरी कोपऱ्यावरील गंपूला त्यात बदल करण्यास वाव आणि मुभा आहे. यात गंपू आपल्या अज्ञानामुळे गोंधळ करू शकतो (करेलच!). येथे गंपूने लेखातील संदर्भ तपासून मगच आपले बदल करणे अपेक्षित आहे. असे बदल करताना गंपूने संदर्भ देणे किंवा चर्चापानावर बदल करण्याचा प्रस्ताव मांडणेही अपेक्षित आहे. असे बदल झाल्यावर टायसन यांनी (किंवा विकिपीडियावरील इतर सदस्यांनी ) या लेखावर लक्ष ठेवून गंपूने केलेले बदल तपासणे व योग्य नसल्यास ते कारण/संदर्भ देउन काढणे हाच उपाय आहे. गंपूने खोडसाळपणे असे बदल चालू ठेवले तर त्याला ताकीद देणे आणि प्रसंगी तडीपार करणे हे प्रचालकांचे काम आहे.
काही लेख अपवादात्मक परिस्थितीत सुरक्षित करता येतात आणि कोणतेही बदल प्रथम चर्चापानावर घालून, चर्चा झाल्यावर समाविष्ट करण्याचा नियमही लागू केला जातो.
असे सगळे असले तरीही परस्परांच्या अभ्यासाचा आदर करणे हा तर विकिपीडियावरील मूलभूत नियम आहे आणि त्याला पर्याय नाही. असे नाही झाले तर प्रचालक तेथे मध्यस्थी करतात. हा नियम वरील उदाहरणातील गंपू आणि टायसन दोघांनाही लागू पडतो.
यातूनही जर मध्यममार्ग असेल तर चर्चा करुन आपल्याला लागू करता येईल.
अभय नातू (चर्चा) २१:२६, ९ मे २०१८ (IST)[reply]

राधेचे वय[संपादन]

जेव्हा कृष्ण साताठ वर्षांचा होता तॆेव्हा राधा ही सहा वर्षांची होती. . [१] इति - 2405:204:9080:7e63::28ab:68a5

वरील पुस्तकात राधेच्या वयाचा उल्लेख सापडला नाही. परंतु राधा कृष्णापेक्षा किमान १० वर्षांनी मोठी होती या माहितीसाठी हे पहावे. ... (चर्चा) १५:५५, ९ मे २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार! आपल्या सविस्तर उत्तराबद्दल आभार.मुळात असं होतच की आपण ज्या विषयात काम करत असतो तो विषय आपल्या कामात डोकावतच असतो.त्यातूनही ज्ञानकोशीय काम करताना ही जबाबदारी जाणवते की आपण जे नोंदवू ते योग्य आणि ससंदर्भ असावं.त्यामुळे जेव्हा असे संदर्भ नोंदवले जातात तेव्हा ते तपासून खात्रीलायक असावे हेही महत्वाचे.तुमचा मुद्दा मला समजला.अन्य संपादकांचे मला माहिती नाही पण तुम्ही पाहिलं असेलच की मी केवळ माझ्याच अभ्यासविषयात काम करणारी संपादिका आहे कारण ज्या विषयात आपल्याला नेमकी माहिती असेल तेच विषय जगाला माहिती देताना आपण मांडावेत अशी माझी व्यक्तिशः धारणा आहे.आणि मी तसा प्रयत्न करते.त्यामुळे मुक्त ज्ञानकोशात कुणीही लेखन करतं हे अपेक्षितच आहे पण त्यातही चर्चा पातळीवर सुसंवाद असावा आणि समोरच्या संपादकाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याची भूमिकाही असावी.धन्यवाद!०८:११, ११ मे २०१८ (IST)[reply]

चर्चा पातळीवर सुसंवाद असावा आणि समोरच्या संपादकाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याची भूमिकाही असावी
यात दुमत नाही!
अभय नातू (चर्चा) ०२:५६, १२ मे २०१८ (IST)[reply]
  1. ^ Pauwels, Heidi R. M. (2008-10-09). The Goddess as Role Model: Sita and Radha in Scripture and on Screen (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780199708574.