चर्चा:चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Challenging proposed speedy deletion[संपादन]

हा लेख एका महत्वाच्या व्यक्तीच्या आत्मचरित्रसंबंधी आहे. तो विकिपीडियावर असण्याइतका निश्चितच महत्वाचा आहे. अवैश्वकोशीय, ललित लेखन अशी लेबलं त्यावर चिकटवून तो speedy deletion साठी नामांकित करणे विकिपीडियाच्या सर्वसमावेशक धोरणासाठी उचित नाही. हे निकष कठोरपणे लावल्यास आपल्याला निदान मराठी विकिपीडियावरील निदान १०% म्हणजे किमान ३००० लेख delete करावे लागतील. मी स्वतः यावर थोडे काम करून wikify करण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयात जाणकार असलेल्या अधांतर यांच्याशी चर्चा करून यात सुधारणा घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. गणेश धामोडकर ०२:५८, १० सप्टेंबर २०१० (UTC)

नमस्कार! अवैश्वकोशीय, ललित लेखन अशी लेबलं ही लेखाच्या सांप्रत स्वरूपावरून लावली असावीत, असा माझा कयास आहे. सध्याचे लेखाचे स्वरूप एखाद्या विषयावरील ब्लॉगपोस्टीसारखे, व्यक्तिगत मते व सापेक्ष टिप्पण्यांनी अविश्वकोशीय झाल्यासारखे वाटते. मुळात त्या पुस्तकावरील रसास्वादासारखे किंवा कांबळ्यांवरील गुणप्रशस्तीपर लेखासारखे स्वरूप ज्ञानकोशात असणे अपेक्षित नाही. त्या पुस्तकाची वस्तुनिष्ठ माहिती नोंदवणे ज्ञानकोशीय लेखनशैलीला अनुसरून होईल.
विकिकरणाबरोबरच या लेखाचे विश्वकोशीय पुनर्लेखन होणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५५, १० सप्टेंबर २०१० (UTC)
गणेश,
सर्वप्रथम, या लेखावर लावलेल्या साच्याला लेखनातूनच आव्हान दिल्याबद्दल व भावनिक, आततायी वाद न सुरू न केल्याबद्दल धन्यवाद.
संकल्पने वर म्हणल्याप्रमाणे लेखाचे स्वरुप स्तुतीपर झाल्याचे वाटते आहे. ते वस्तुनिष्ठ केल्यास लेखाचे महत्व व गुणवत्ता वाढेल असे माझे मत आहे. यासाठी पहिल्या उतार्‍यात मी बदल केला आहे. यात लेखनाचा अर्थ व आशय न बदलता मजकूर वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न आहे.
दुसरे म्हणजे लेखात पुस्तकाचे वर्णनापेक्षा पुस्तकातील मजकूराचे वर्णन किंवा उतारे जास्त दिसत आहेत. ते टाळल्यास लेखाचा रोख पुस्तकाविषयीच आहे हे स्पष्ट होईल. श्री. कांबळे यांच्याबद्दलची माहिती अरुण कांबळे येथे घालावी (अर्थात, वस्तुनिष्ठ स्वरुपातच).
सदस्य अधांतर यांच्याबद्दल मला जुजबी माहिती आहे. ते श्री कांबळे यांचे निकटवर्तीय आहेत असा माझा कयास आहे. त्यांचे मराठी विकिपीडियावर बरेच मोलाचे योगदान आहे. त्यांनी मदत केल्यास नक्कीच लेखात भर पडेल.
असो.
क.लो.अ.
अभय नातू ०४:०३, १० सप्टेंबर २०१० (UTC)
ता.क. पानाकाढा हा साच बदलून बदल साचा लावत आहे.