चक्रीवादळ
चक्रीवादळ ( इंग्लिश: Cyclonic storm) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणार्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणार्या चक्रीवादळाला इंग्रजी भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये हरिकेन आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावांने ओळखले जाते.
जेव्हा चक्रीवादळ्सदृश संरचना जमिनीवर तयार होते तेव्हा तिच्यातल्या एका प्रकाराला टोरनॅडो(घूर्णवात)) असे म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो.
घूर्णवात लहान किंवा मोठे असले. तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी वेग ताशी १७५ किलोमीटरपेक्षा पेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत होत असले तरी, अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे.