ग्वादालकॅनाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्वादालकॅनाल नैऋत्य प्रशांत महासागरातील सॉलोमन द्वीपसमूहात असलेले सगळ्यात मोठे बेट आहे.

दुसऱ्या महायुद्धात १९४२-४३च्या सुमारास येथे व आसपासच्या समुद्रां जपानदोस्त राष्ट्रांत महाभयानक लढाया झाल्या.

होनियारा हे ग्वादालकॅनालच्या उत्तर किनाऱ्यावरील शहर ब्रिटिश आधिपत्याखालील सॉलोमन द्वीपसमूहांची राजधानी होती. स्वातंत्र्यानंतरही हेच शहर येथील राजधानी आहे. हे बेट जवळजवळ संपूर्णपणे जंगलाने नटलेले आहे. येथे माउंट पोपोमानास्यू हा जागृत ज्वालामुखी आहे.

१९९८मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे ८५,००० होती.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. (2006) Australia's arc of instability: the political and cultural dynamics of regional security, पृ. 181. आय.एस.बी.एन. 9781402038259. 20 October 2010 रोजी मिळवले.