ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
United Kingdom of Great Britain and Ireland
 
इ.स. १८०१इ.स. १९२२  
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Dieu et mon droit (फ्रेंच) "देव आणि माझा अधिकार"
राजधानी लंडन
अधिकृत भाषा इंग्लिश
क्षेत्रफळ ३,१५,०९३ चौरस किमी
लोकसंख्या ४,२७,६९,१९६ (१९२११)
–घनता १३५.७ प्रती चौरस किमी

ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्रआयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला.

विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला.

आयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले.

बाह्य दुवे[संपादन]