गिरीश कर्नाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गिरीश कर्नाड
Karnad.jpg


जन्म मे १९, इ.स. १९३८
माथेरान, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
साहित्यप्रकार नाटक, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती नाटके: तुघलक, हयवदन, नागमंडल
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)

गिरीश कर्नाड (जन्म: मे १९, इ.स. १९३८), हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला.

शिक्षण[संपादन]

कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले.

चित्रपट[संपादन]

गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.

नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगनेओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत.

गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे.

गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

गिरीश कर्नाड यांनी दिगदर्शित केलेले व गाजलेले चित्रपट[संपादन]

  • उत्सव (हिंदी भाषेत)
  • उंबरठा (मराठी)
  • ओंदनोंदू कालादल्ली (कानडी)
  • कनक पुरंदर (कानडी)
  • काडू (कानडी)
  • कानुरू हेग्गदिती (कानडी)
  • गोधुलि (हिंदी)
  • तब्बलियू नीनादे मगने (कानडी)
  • निशांत (मराठी)
  • वंशवृक्ष (कानडी)

कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.

गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार[संपादन]

आत्मचरित्र[संपादन]

गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते.

बाह्य दुवे[संपादन]