क्रौंच
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठले तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठि प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण्याचे मुख्य कारण त्यांची होणारी शिकार तसेच प्रजननाचे कमी प्रमाण व इतर मानवी हस्तक्षेप इत्यादी आहेत. इतर पाणथळी पक्ष्याचे म्हणजे हेरॉन, करकोचे व बगळ्यांचे क्रौंच हे भाउबंद आहेत. लांब वरुन हे सारखेच दिसतात परंतु क्रौंच पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांची मान लांब करुन उडतात तर इतर बगळे व करकोचे हे मान इंग्रजी एस आकारात दुमडुन उडतात. तसेच इतरांपेक्षा क्रौंच पक्षी हे लांबवर उड्डाणे भरतात. काहि आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कधी मोठे मोठे कळप करुन राहातात तर कधी कधी एकटे अथवा फक्त जोडिदाराबरोबर असतात.
[संपादन] मुख्य जाती
- सारस क्रौंच (Grus antigone )
- सायबेरियन क्रौंच (Grus leucogeranus )
- जापानी क्रौंच(Grus japonensis)
- कांड्या करकोचा (Anthropoides virgo )
- तुरेवाला क्रौंच ( काळा व करडा )
- साधा क्रौंच (Grus grus)
[संपादन] संस्कृतीमध्ये
क्रौंच भारतीय संस्कृती मध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरुन नर- मादि जोडि असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य ज्यांनी पाहिले असेल त्यांना वरचे प्रतिक मनोमन पटेल.
[संपादन] भारतातील क्रौंच
भारतात सारस क्रौंच, सायबेरियन क्रौंच, कांड्या करकोचा (क्रौंच) व साधा क्रौंच हे मुख्यत्वे आढळुन येतात. सायबेरियन क्रौंच हा हिवाळ्यात सायबेरिया येथुन राजस्थानमधील भरतपुर येथे स्थलांतर करतो. हा पक्षी आता अत्यंत दुर्मिळ झाला असुन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

