सायबेरियन क्रौंच
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा मुख्यत्वे सायबेरियातील स्थानिक क्रौंच असुन भारतात स्थलांतर करतो. अत्यंत दुर्मिळ अश्या पक्ष्यांमध्ये याची गणना होते व सध्या नामाशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा पक्षी भारतातील भरतपुर येथील राष्ट्रिय उद्यानात काहि काळापर्यंत नियमीतपणे स्थलांतर करत असे. परंतु काहि वर्षांपासुन या पक्ष्यांची संख्याच न उरल्याने स्थलांतर होत नाहि. सध्या रशियन सरकार तर्फे या पक्ष्याला वाचवायचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालु आहेत. सायबेरीयातील जंगलामध्ये काहि कळप शिल्ल्क असुन त्यांची संख्या काहि शेकड्यांमध्ये आहे. या पक्ष्यांची संख्या कमी व्हायचे मोठे कारण म्हणजे झालेली शिकार. या पक्ष्यांचा स्थलांतराच्या मार्गात खासकरुन अफगणीस्थान व पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात शिकार होत असे.

