को. ब्रा. कट्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

को. ब्रा. कट्टा या नावाच्या युवकांच्या संस्था डोंबिवली, पेण आणि विलेपार्ले(मुंबई) या ठिकाणी आहेत.

तरुणांच्या कलागुणांना आणि अभिव्यक्तीला वाट करून देण्यासाठी स्वप्नील घैसास या तरुणाने २५ एप्रिल २००९ साली डोंबिवलीमध्ये युवा कोकणस्थ ब्राह्मण कट्ट्याची सुरुवात केली. या कट्ट्याच्या नावात जरी कोकणस्थ ब्राह्मण हे शब्द असले तरीही हे व्यासपीठ कोकणस्थ ब्राह्मणांपासून सर्व जातिधर्मांच्या युवकांसाठी खुले आहे. ' बाय कोब्रा टू ऑल युथ ' असा यांचे ब्रीदवाक्य आहे. या संस्थेसाठी घुले यांनी, डोंबिवलीतील केळकर रोडवरील वरदान अपार्टमेंटमधील एक छोटेसे सभागृह उपलब्ध करून दिले. आता तेथे तरुण मुलांचे विविधकला गुणदर्शनाचे कार्यक्रम होत असतात.[१]

विलेपार्ले(मुंबई) येथे बाराहून अधिक वर्षे भरणाऱ्या पार्ले महोत्सवात विले पार्ल्याच्या को.ब्रा. कट्ट्याचा सहभाग असतो.

संदर्भ[संपादन]