Jump to content

काकड आरती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काकडा आरती या पानावरून पुनर्निर्देशित)
काकड आरती सादर करताना भाविक

काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय.[] या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात.[] भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.[]

स्वरूप

[संपादन]

कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे.[] आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात.[] कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.[] संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत.[]

अन्य उपक्रम

[संपादन]
आरती करताना महिला भक्त

काकड आरतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात विविध गावांमध्ये विविध उपक्रम केले जातात.[] काही ठिकाणी कार्तिक महिन्यात रथोत्सवासाठी गावकरी एकत्र जमतात आणि सोहळ्याचा आनंद घेतात.[]

चित्रफीत

[संपादन]
Offerings to lord during Kakada prayer

काकड आरतीचा नमुना

[संपादन]
  • भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |

पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |

दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||

काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |

कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||

राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही

मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||

विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |

कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||

तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |

विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||[]

  • सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला|

भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा प्रासादिक अनुभव जरूर घ्या!". लोकमत. 2022-11-02. 2022-11-12 रोजी पाहिले.
  2. ^ a b "विठ्ठल मंदिराच्या काकड आरतीला १५० वर्षांची परंपरा". सकाळ. ३.११.२०१९. १४.१२.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Dasarā-Divāḷī. Mahārāshṭra Śāsana Śikshaṇa Vibhāga, Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīsāṭhī. 1990.
  4. ^ [https://www.dainikprabhat.com/pune-district-various-programs-in-taluka-to-mark-the-end-of-kakad-aarti/ "पुणे जिल्हा: काकड आरती समाप्तीनिमित्त तालुक्या�"]. दैनिक प्रभात. 2023-11-30. 2023-12-07 रोजी पाहिले. replacement character in |title= at position 47 (सहाय्य)
  5. ^ "काकड आरती सोहळ्याला वडगावात उत्साहात सुरू". सकाळ. 2022-11-12 रोजी पाहिले.
  6. ^ a b c Gokhale, Mahādeva Vināyaka (1967). Marāṭhī āratī. Sāvitrī Prakāśana.
  7. ^ "काकड आरती समाप्तीचा नऱ्हे येथे रंगला सोहळा". सकाळ. 2023-11-28. 2023-12-07 रोजी पाहिले.
  8. ^ "अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्तिक रथोत्सव". सकाळ. 2022-11-12 रोजी पाहिले.