कंबरमोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.
कंबरमोडी

कंबरमोडी (इं:Tridax procumbens)[ दुजोरा हवा] (चर्चापान वाचावे!) ही एक सूर्यफूल (Compositae) कुळातली लहान वनस्पती आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी[ दुजोरा हवा], याच्या पाल्याला दगडी पाला[ दुजोरा हवा] आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल[ दुजोरा हवा] म्हणतात. या वनस्पतीच्या पानात आयोडिन असावे.[ संदर्भ हवा ] पायास ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे जखम झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात.[ संदर्भ हवा ] साचा:वैज्ञानिक दुजोरा हवा त्याने जखमेचे निर्जंतुकीकरण होते व ती पिकत नाही; जखमेस खपली धरते. तोंड आले असताही या वनस्पतीच्या पानांच्या रसाचा उपयोग होतो.[ संदर्भ हवा ]

ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. कंबरमोडी ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.

वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळा होऊन तो उंच वाढतो.[ संदर्भ हवा ] पोपटी-हिरव्या रंगाच्या या देठाला बिनवासाचे एक फूल लागते.[ दुजोरा हवा] (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.[ संदर्भ हवा ]

ही वनस्पती कमी पाण्याच्या भागांत, मोकळ्या माळरानांत, शेतीच्या जवळच्या भागांत भरभर वाढणारी, दुर्लक्षित[ दुजोरा हवा] वनस्पती आहे. समूळ नष्ट केल्यासही हे झुडूप परत परत उगवते. हे तण नको असेल तर फूल येण्यापूर्वीच उपटावे.[ संदर्भ हवा ]

हेही पहा[संपादन]

http://raanaphule.blogspot.com/


चित्र दालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.