चर्चा:कंबरमोडी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या झुडुपाला महाराष्ट्राच्या कुठल्या भागात कंबरमोडी म्हणतात? दाखविलेल्या चित्रावरून आणि वर्णनावरून हे बंदुकीच्या फुलाचे झाड आहे हे स्पष्ट कळते. झाडाचे दांडीसकटचे फूल घेऊन फुलाला टिचकी मारली की ते बंदुकीच्या गोळीसारखे लांब जाते. म्हणून हे नाव. त्यामुळे, मूळ लेखकाने किंवा अन्य कुणीही कंबरमोडी शब्दाचा उगम सांगितल्यास बरे वाटेल. ---J १२:५०, ५ एप्रिल २०११ (UTC)

एखादे नाव नवीन भासल्यास आणि विश्वकोशिय उल्लेखनीयता तपासण्याच्या दृष्टीने, ज्या शब्दाची माहिती शोधावयाची त्यावर डबल क्लिक सलेक्ट करून माऊसवरील उजवा क्लिक मारावा "सर्च गूगल फॉर 'कंबरमोडी' असा पर्याय मिळतो तो निवडावा . म्हणजे तो उल्लेख गूगलवर इतर कुणी केल्याचे आढळते का ते पहाणे सोपे जाते.
गूगलशोधात कंबरमोडी वनस्पतीची दखल दैनीक देशोन्नतीच्या सानगडी येथून पाठवीलेल्या बातमीपत्रात आढळते. पण हे सानगडी कुठे आहे त्याबद्दल कल्पना नाही.आरोग्यविद्दा नावाच्या संकेतस्थळावर सुद्धा अयूर्वेदीय वनस्पती म्हणून उल्लेख आढळला.
दैनिक देशोन्नतीच्या बातमी पत्रात भाजी म्हणून उल्लेख आढळतो तर लोकमतच्या एका बातमीपत्रात वनस्पतीमुळे विषबाधा होते असा उल्लेख आढळतो. एकाच नावाने ओळखल्या जाणार्‍या वेगवेगळ्या वनस्पती आहेत का काही भागात गैरसमजुतीने विषारी समजली जाते ?
माहितगार १४:५२, ५ एप्रिल २०११ (UTC)

देशोन्न्ती आणि आरोग्यविद्या[संपादन]

देशोन्नतीवर कंबरमोडी म्हणून ज्या रानभाजीचा उल्लेख केला आहे ती ही Tridex procumbens नाही. आरोग्यविद्यावरचा वनस्पतींच्या माहितीचा दुवा उघडता आला नाही. ही वनस्पती औषधी असलीच तर जखमेला लावण्यापुरती, खाणेयोग्य नाही हे नक्की. विषारी असेल किंवा नसेल. ज्याने हा लेख लिहिला त्याने या वनस्पतीचे नाव कंबरमोडी आहे जे कसे जाणले? एवढाच माझा मुद्दा होता.

सूर्यफुलाच्या कुळात एकदांडीप्रमाणेच पाथरी, म्हातारी, दुमुंडी(लांडगी) वगैरे तणे आहेत. या म्हातारीचे कापसासारखे उडणारे बी अनेकांनी पाहिले असेल. दुमुंडीला आम्हा कुत्रा म्हणतो, याचे काटेरी फळ रानातून जातायेताना धोतर-पायजमा पकडते.

http://raanaphule.blogspot.com/...या स्थळावर एकदांडीचे चित्र आहे, या वनस्पतीला दगडी पाला म्हणतात असे त्यावरून दिसते आहे. पण हे दुसरे नाव अधिकृत नसावे. गूगलवर एकदांडी शोधल्यास अनेक पाने सापडावीत, कंबरमोडीपेक्षा नक्कीच अधिक!......J १५:४८, ५ एप्रिल २०११ (UTC)


सानगडी हे गाव भंडारा जिल्यात , साकोली तालुक्यात आहे ( राज्य : महाराष्ट्र ). सानगडी हे गाव जंगलाला लागून असल्याने तिथे कंबरमोडी मुबलक प्रमाणात आढळून येते.


या वनस्पती ला कंबर मोडी, टनटनी, तसेच जखमजुडी पण म्हणतात. ही छोट्या जखमेवर लावल्यास रक्त येणे थांबते, निर्जतुकी करण पण होते आणि जखम लवकर भरते. तोंड आल्यावर याच्या पानांचा रस तोंडात घेऊन परत थुकून टाकतात. संतोष गोरे (चर्चा) १८:४३, १६ जुलै २०१८ (IST)[reply]

इंग्रजी लेखात या वनस्पती ला tridex procumbens म्हटलं आहे. संतोष गोरे (चर्चा) १८:५०, १६ जुलै २०१८ (IST)[reply]

सानगडी आणि कंबरमोडी[संपादन]

सानगडी कुठे आहे ते समजले. या गावात कंबरमोडी उगवतही असेल, पण तिला कंबरमोडी म्हणायचे की बाकीचे लोक म्हणतात तसे एकदांडी म्हणायचे हा कळीचा मुद्दा आहे आरोग्यविद्याचे पान उघडता आले. तिथे फक्त कंबरमोडी हे नाव अनेक औषधी वनस्पतींच्या नावांत आले आहे. वनस्पती कशी दिसते, किंवा तिला अन्य कोणकोणती नावे आहेत हे सांगितलेले नाही.....J १७:११, ६ जुलै २०११ (UTC)

दुजोरा हवा ?[संपादन]

या लेखात प्रत्येक ओळी नंतर " दुजोरा हवा " का लिहिले, काही समजले नाही, एखादी दुसरी ओळ ठीक आहे.... संतोष गोरे (चर्चा) १८:४६, १६ जुलै २०१८ (IST)[reply]